अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने... एकिकडे खराब फटके मारून भारताचे फलंदाज यजमान ऑस्ट्रेलियाला विकेट भेट देत होते, परंतु पुजाराने जबाबदारीने खेळ करताना भारताला संघात कमबॅक करून दिले. पुजाराने 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुर्दैवाने दिवसाच्या 88 व्या षटकात पुजाराला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. पुजाराने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे 16 वे शतक ठरले आणि याचबरोबर त्याने 5000 धावांचा पल्लाही ओलांडला. या कामगिरीसह पुजाराने 'द वॉल' राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 1st Test : 'द वॉल' द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय पुजारा... हे बघा 'सेम टू सेम' आकडे
IND vs AUS 1st Test : 'द वॉल' द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय पुजारा... हे बघा 'सेम टू सेम' आकडे
India vs Australia 1st Test: अॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:48 IST
IND vs AUS 1st Test : 'द वॉल' द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय पुजारा... हे बघा 'सेम टू सेम' आकडे
ठळक मुद्देअॅडलेड कसोटीचा पहिला दिवस गाजवला तो चेतेश्वर पुजाराने... पुजाराे 123 धावांसह ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावलेत्याने कसोटीतील 5000 धावांचा पल्लाही ओलांडला