Join us

IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'

मार्शनं सलग १८ व्या वेळी टॉस जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:38 IST

Open in App

India vs Australia  1st T20I : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्यी टी-२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात सलग १८ वेळा नाणेफेक जिंकून मिचेल मार्शनं धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे.  सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंगशिवाय मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाचा युवा अष्टपैलू पहिल्या तीन सामन्यातून 'आउट' टॉसनंतर भारतीय संघाच्या ताफ्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. युवा अष्टपैलून नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-२० सामन्यांतून संघाबाहेर असेलय. अ‍ॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या डाव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरत असलेल्या या अष्टपैलू खेळाडूला मानेच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन टी-२० सामन्यासाठी संघाचा भाग नसेल.  

भारताची प्लेइंग इलेव्हन :

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

  

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन :

मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (कर्णधार), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.

English
हिंदी सारांश
Web Title : Marsh's Toss Record, India's Young All-rounder Out of First Three T20I

Web Summary : Australia won the toss and chose to bowl in the first T20I. Marsh has won 18 consecutive tosses. Young Indian all-rounder Nitish Kumar Reddy is out of the first three T20Is due to injury. India's and Australia's playing elevens are announced.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार यादवअर्शदीप सिंग