Join us  

India vs Australia : असं भारतातच घडू शकतं; ...म्हणून पहिल्या सामन्यात व्यत्यय!

या सामन्यात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:05 AM

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हीड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. 

नववर्षातील पहिला पराभव अन् विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम

India vs Australia: वॉर्नर-फिंचनं रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध 'हा' विक्रम ठरला खास

India vs Australia: पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार

नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या.

India vs Australia : दहा विकेट्सने लाजीरवाणा पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही, तर...

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास; देशासाठी केला मोठा पराक्रम

India vs Australia : वॉर्नर आणि फिंच यांनी विश्वविक्रमासह भारताला दिला पराभवाचा धक्का

हा सामना काही काळ थांबवण्यात आला होता. सामना सुरू असताना एक पतंग स्टेडियमवरील स्पायडर कॅम्पच्या वायरमध्ये अडकली. त्यामुळे सामन्यात व्यत्यय निर्माण झाला होता.  भारताच्या डावाच्या 49व्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी एक पतंग मैदानावर आली. फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद शमीच्या नजरेत ही गोष्ट सर्वप्रथम आली आणि त्यानंतर वॉर्नरनं ती उचलून पंचांना दिली. या प्रसंगावरून सोशल मीडियावरही मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंच