India vs Australia: वॉर्नर-फिंचनं रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध 'हा' विक्रम ठरला खास

वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतक करण्याची ही दुसरी वेळ आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:14 AM2020-01-15T10:14:28+5:302020-01-15T10:15:06+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 1st ODI: David Warner and Aaron finch wrote a history against India | India vs Australia: वॉर्नर-फिंचनं रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध 'हा' विक्रम ठरला खास

India vs Australia: वॉर्नर-फिंचनं रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध 'हा' विक्रम ठरला खास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देवन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतक करण्याची ही दुसरी वेळ आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः यजमान भारताला पहिल्या वन डे सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांचा अपयशाचा पाढा गोलंदाजांनीही गिरवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. या खेळीसह वॉर्नर आणि फिंच या जोडीनं टीम इंडियाविरुद्ध एका खास विक्रमाची नोंद केली.

India vs Australia: पहिल्या सामन्यातील 'त्या' निर्णयाचा विराट कोहली पुनर्विचार करणार

नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटलाही प्रथम गोलंदाजीच हवी होती, परंतु नाणेफेक फिंचनं जिंकली. या सामन्यात टीम इंडिया तीन सलामीवीरांसह मैदानावर उतरली. पण, त्यापैकी रोहित शर्माने निराश केले. तो अवघ्या 10 धावांवर माघारी परतला, परंतु लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला. मिचेल स्टार्कनं तीन, तर पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

India vs Australia : दहा विकेट्सने लाजीरवाणा पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही, तर...

 

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास; देशासाठी केला मोठा पराक्रम

India vs Australia : वॉर्नर आणि फिंच यांनी विश्वविक्रमासह भारताला दिला पराभवाचा धक्का


255 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचीही तशीच अवस्था होईल, असं अनेकांना वाटत होते. पण, वॉर्नर आणि फिंच या जोडीनं खेळपट्टीवर तंबू रोवला आणि यजमानांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या.


ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता 256 धावांचे लक्ष्य पार केले आणि त्यांचा हा मोठा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं एकही विकेट न गमावता 279 धावांचे लक्ष्य पार केले होते. वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी शतक करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अॅडम गिलख्रिस्ट आणि सायमन कॅटिच यांनी 2006मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. पण, वॉर्नर व फिंच यांचा विक्रम खास ठरला. धावांचा पाठलाग करताना भारताविरुद्ध दोनही सलामीवीरांनी शतक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
 

Web Title: India vs Australia, 1st ODI: David Warner and Aaron finch wrote a history against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.