IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका! स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा; मोहम्मद शमीची कमाल

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:14 PM2023-09-22T15:14:36+5:302023-09-22T15:17:42+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 1st ODI Live Mohammed Shami dismissed Steve Smith to give Australia their third blow | IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका! स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा; मोहम्मद शमीची कमाल

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका! स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा; मोहम्मद शमीची कमाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st ODI Live Marathi | मोहाली : सुरूवातीलाच मिचेल मार्शच्या रूपात मोठा झटका बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नर-स्मिथच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवण्यास सुरूवात केली. पण, खतरनाक वाटणाऱ्या वॉर्नरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात रवींद्र जडेजाला यश आले. मात्र वॉर्नरने (५२) धावांची अर्धशतकी खेळी करून कांगारूच्या संघाला साजेशी सुरूवात करून दिली. 

वॉर्नरने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत ५२ धावा कुटल्या. वॉर्नर बाद होताच डाव पुढे नेण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर होती. पण मोहम्मद शमीने स्मिथचा (४१) धावांवर त्रिफळा काढून ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. 

 आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

Web Title: India vs Australia 1st ODI Live Mohammed Shami dismissed Steve Smith to give Australia their third blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.