India vs Australia 4th test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अंतिम कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सामन्यापूर्वी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या समारंभात उपस्थित होते. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या या भेटीमुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुमारे तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळेच सामन्यापूर्वी वॉर्म अपसाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही आणि त्यांना नेटमध्ये बाहेर सराव करावा लागला.
चतुर रोहित! क्षणात रणनीती बदलली अन् मोहम्मद शमीने मोठी विकेट मिळवून दिली, Video
नाणेफेकीच्या काही मिनिटे आधी खेळाडूंना वॉर्म अपसाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही पंतप्रधानांच्या भोवती बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अहमदाबाद कसोटीपूर्वी सरावासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. सरावाच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलिया अँथनी अल्बानीज रथातून संपूर्ण स्टेडियमला प्रदक्षिणा घालत होते. ( भारत- ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीचे पूर्ण धावफलक)
रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील संघांना चौथ्या कसोटीपूर्वी नेटमध्ये सराव करण्यासाठी स्टेडियमबाहेर जावे लागले. या संपूर्ण सोहळ्यामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला. बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही चाहत्यांनी राजकारणापेक्षा क्रिकेटवर वर्चस्व गाजवल्याबद्दल नेत्यांवर टीका केली. मात्र, एवढ्या कडेकोट बंदोबस्तात काही काळ खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी असताना एक कुत्रा मैदानात घुसला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुमारे ३,००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सेक्टर-1 जेसीपी आणि डीआयजी नीरज बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली 11 एसपी दर्जाचे अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांसह 200 पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने स्टेडियम आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्था सांभाळली. याशिवाय 1,500 वाहतूक पोलीस कोठेही जाम होऊ नये यासाठी ड्युटीवर होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"