India vs Australia 3rd test live score updates : भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. पण, रवींद्र जडेजाने त्यांना पहिल्याच दिवशी माघारी पाठवले. पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. पण, गोलंदाजीत बदल करणे भारताच्या पथ्यावर पडले. उमेश यादव ( Umesh Yadav) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी १२ धावांत ऑसींच्या ६ फलंदाजांना माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. Ind vs aus 3rd test match live score
भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (१२) शुबमन गिल ( २१), चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( २२) व केएस भरत ( १७) यांनी संघर्ष केला. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ट्रॅव्हीस हेड ( ९) लगेच माघारी परतला. उस्मान ख्वाज आणि मार्नस लाबुसेन यांनी ९६ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ९१ चेंडूंत ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला. ख्वाजा १४७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर बाद झाला. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. Ind vs aus scorecard
पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली. हँड्सकोमब्ला ( १९) त्याने पायचीत केले. त्यानंतर उमेश यादवने एकाच षटकात कॅमेरून ग्रीन ( २१) व मिचेल स्टार्क ( १) यांना बाद केले. उमेशने स्टार्कसाच त्रिफळा उडवला. अश्विनने पुढील षटकात अॅलेक्स केरीला ( ३) पायचीत पकडले. सामना अचानक भारताच्या बाजूने फिरला. उमेशने टॉड मर्फीचा त्रिफळा उडवला. उमेशने घरच्या मैदानावर १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांनी ८८ धावांचीच आघाडी घेतलीIndia vs Australia test series
उमेश यादवच्या वडिलांचे २३ फेब्रुवारीला निधन झाले त्यानंतर तो लगेच भारतीय कर्तव्यासाठी परतला. पहिल्या डावात त्याने १३ चेडूंत १७ धावांचे योगदान दिले होते आणि गोलंदाजीत ५ षटकांत १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात त्याने भारतीय खेळपट्टीवर १०० विकेट्स घेण्याचा मान पटकावला.
कपिल देव ( २१९), जावगल श्रीनाथ ( १०८), झहीर खान ( १०४), इशान शर्मा ( १०४) आणि उमेश यादव ( १०१) या जलदगती गोलंदाजांना मायभूमीत १००+ विकेट्स घेता आल्या आहेत. Ind vs aus live match
![]()
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : Umesh Yadav lost his father on 23rd February and he is playing Test match for India and now he cleans up Mitchell Starc & tod Murphy to grab his 100th Test wicket at home, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.