Ind vs Aus 3rd test live : आर अश्विनने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; श्रेसय अय्यरने घेतला Sharp कॅच, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:18 PM2023-03-02T13:18:11+5:302023-03-02T13:22:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 3rd test live scorecard Indore : Ravichandran Ashwin surpasses Kapil Dev to become India's third-highest wicket-taker in international cricket, Shreya Iyer take sharp catch to remove Handscomb | Ind vs Aus 3rd test live : आर अश्विनने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; श्रेसय अय्यरने घेतला Sharp कॅच, Video 

Ravichandran Ashwin surpasses Kapil Dev

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांच्यानंतर पीटर हँड्सकोम्ब व कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चांगला संघर्ष केला, परंतु ड्रिंक्स ब्रेकनंतर त्यांचा डाव गडगडला. उमेश यादव ( Umesh Yadav) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी ११ धावांत ऑसींच्या ६ फलंदाजांना माघारी पाठवले. आर अश्विनने महान कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांचा विक्रम मोडला. Ind vs aus scorecard

BSD@@! रोहित शर्मा खवळला, Live Match मध्ये रवींद्र जडेजाला घातली शिवी अन्... Video Viral


भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ट्रॅव्हीस हेड ( ९) लगेच माघारी परतला. उस्मान ख्वाज ( ६०) आणि मार्नस लाबुसेन ( ३१) यांनी ९६ धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. पीटर हँड्सकोम्ब ( १९) व कॅमेरून ग्रीन (२१) हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली.  ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांनी ८८ धावांचीच आघाडी घेतली India vs Australia test series 

आर अश्विनने आज कपिल देव यांचा विक्रम मोडला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज बनला. अॅलेक्स केरी याला LBW करून अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३४७ डावांतील ६८८वा बळी टिपला. कपिल देव यांनी ४४८ डावांत ६८७ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने कसोटीत १७१ डावांत २३.९३च्या सरासरीने ४६६ विकेट्स घेतल्या आहेत. वन डे व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे १५१ व ७२ विकेट्स आहेत. या क्रमवारीत अनिल कुंबणे ९५३ विकेट्ससह आघाडीवर आहे. त्यानंतर हरभजन सिंग ( ७०७) याचा क्रम येतो.  Ind vs aus 3rd test match live score


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : Ravichandran Ashwin surpasses Kapil Dev to become India's third-highest wicket-taker in international cricket, Shreya Iyer take sharp catch to remove Handscomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.