Join us

Ind vs Aus 1st test live : दोन पदार्पणवीरांसह भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार, नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूने, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन 

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:04 IST

Open in App

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघ घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलून पाहुण्यांवर विजय मिळवण्यासाठी जोर लावणार आहेत. ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. त्याचसोबत भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावता येणार आहे. त्यामुळेच या मालिकेची भारतीयांना अधिक उत्सुकता आहे. २०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला. आजच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची सर्वांना उत्सुकता होती आणि २०२२ मधील ट्वेंटी-२० प्लेअर ऑफ दी ईअर सूर्यकुमार यादवचे आज कसोटी संघात पदार्पण झाले. याशिवाय केएस भरत ( यष्टिरक्षक) याचेही पदार्पण होत आहे.

ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू टॉड मर्फी आज पदार्पण करतोय. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली,  सूर्यकुमार यादव, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव
Open in App