IND vs AFG, U19 World Cup Semifinal : हरारेच्या मैदानात सुरु असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली आहे. फैजल खान ११० (९३) आणि उझैरुल्लाह नियाझाई १०१ (८६) या दोन शतकवीरांच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३१० धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी ३११ धावांचे लक्ष्य मिळाले असून या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाला वैभव सूर्यवंशीकडून धमाकेदार खेळीची अपेक्षा असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलामीवीरांची संयमी सुरुवात
झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ओस्मान सदातने ७० चेंडूंत ३९ धावा करत संयमी सुरुवात करून दिली. दिपेश देवेंद्रनने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्यानंतर खालिद अहमदझाईने ३९ चेंडूंत ३१ धावा करून तंबूत परतला. कौशिक चौहान याने दुसऱ्या सलामीवीराला माघारी धाडले.
IND vs PAK : हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा! अश्विन म्हणतो; पाकिस्तान लवकरच यू टर्न घेईल अन्...
दोन शतकवीरांच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने ३०० पारची केली सेमीची लढाई
दोन्ही सलामीवीर माघारी फिरल्यावर फैसल शिनोझादाने याने अवघ्या ९३ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ११० धावांची शानदार खेळी साकारली. दुसऱ्या टोकाला उझैरुल्लाह नियाझाईने जबाबदारीने फलंदाजी करत ८६ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अखेरीस अझीझुल्लाह मियाखील (१२) आणि अब्दुल अझीज (नाबाद ७) यांनी झटपट धावा जोडत संघाची धावसंख्या ३१० पर्यंत नेली.