Join us  

IND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:00 PM

Open in App
ठळक मुद्देधोनीचा कर्णधार म्हणून आहे हा 200वा सामना

दुबई  - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय झाली. सलामीवीर लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या शतकी भागीदारीनंतर अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी कोलमडली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 7 धावांची गरज होती. तर अफगाणिस्तानला एका विकेटची गरज होती. अशा परिस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजाने षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयाची आशा पल्लवित केली. मात्र षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाची विकेट काढत रशीद खानने भारताल टायवर समाधान मानण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणने ५० षटकात ८ बाद २५२ धावा केल्या. यानंतर चांगल्या सुरुवातीनंतरही भारतीयांचा डाव ४९.५ षटकात २५२ धावांतच संपुष्टात आला. अखेरपर्यंत टिकलेला रविंद्र जडेजा शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. अखेरच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज असताना भारताला ६ धावाच काढता आल्या.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर अफगाण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शेहझादचे (१२४) तुफानी शतक व मोहम्मद नाबीचे (६४) अर्धशतक या जोरावर अफगाणने समाधानकारक मजल मारली. भारताने आधीच अंतिम फेरी गाठली असल्याने या सामन्यात भारताने रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली होती. मात्र तरीही भारतीय सहज बाजी मारतील अशी शक्यता होती. लोकेश राहुल - अंबाती रायुडू यांनी ११० धावांची जबरदस्त सलामी देत संघाला सकारात्मक सुरुवातही करुन दिली. मात्र नाबीने रायुडूला बाद केले आणि यानंतर ठराविक अंतराने भारताचे बळी गेले. रायुडूने ४९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ५७, तर राहुलने ६६ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ६० धावा केल्या. यानंतर दिनेश कार्तिकने (४४) चांगली खेळी केली. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी (८), मनिष पांड्ये (८), केदार जाधव (१९) अपयशी ठरल्याने भारताची घसरगुंडी उडाली. अष्टपैलू रविंद्र जडेजाने (२५) अखेरपर्यंत भारताच्या आशा कायम ठेवल्या. मात्र संघाला २ चेंडूत एका धावेची गरज असताना तो झेलबाद झाला. अफगाणकडून राशिद खान, नाबी व आफताब आलम यांनी प्रत्येकी २ बळी घेत टिच्चून मारा केला.तत्पूर्वी, सलामीवीर मोहम्मद शेहझादने ११६ चेंडूत ११ चौकार व ७ षटकारांसह १२४ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. नाबीनेही ५६ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या. याशिवाय एकही अफगाण फलंदाज छाप पाडू शकला नाही. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान : ५० षटकात ८ बाद २५२ धावा (मोहम्मद शेहझाद १२४, मोहम्मद नाबी ६४, नझीबुल्लाह झारदान २०, गुलबदिन नाइब १५; रविंद्र जडेजा ३/४६, कुलदीप यादव २/३८, केदार जाधव १/२७, दीपक चहार १/३७, खलील अहमद १/४५.) वि. वि. भारत : ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा (लोकेश राहुल ६०, अंबाती रायुडु ५७, दिनेश कार्तिक ४४, रविंद्र जडेजा २५, केदार जाधव १९, महेंद्रसिंग धोनी ८, मनिष पांड्ये ८; मोहम्मद नाबी २/४०, राशिद खान २/४१, आफताब आलम २/५३, जावेद अहमदी १/१९.)

शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा बाद, भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

 भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज

सिद्धांत कौल धावचीत, भारताची नववी विकेट

 

कुलदीप यादव बाद, भारताला आठवा धक्का

 

भारताला विजयासाठी 12 चेंडूत 13 धावांची गरजभारताला विजयासाठी तीन षटकांत 17 धावांची गरज

भारताला सातवा धक्का : दीपक चहर 12 धावा काढून माघारी

 

भारताला सहावा धक्का; दिनेश कार्तिक बाद

 

 

भारताला पाचवा धक्का; केदार जाधव बाद

 

भारताला चौथा धक्का; मनीष पांडे बाद

 

भारताला मोठा धक्का; महेंद्रसिंग धोनी 8 धावांवर बाद

 

भारताला दुसरा धक्का; सलामीवीर लोकेश राहुल बाद

 

सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक

 

भारताला पहिला धक्का, अर्धशतकवीर रायुडू बाद 

 

अंबाती रायुडूचे अर्धशतक

अंबाती रायुडूच्या षटकाराच्या जोरावर भारताचे अर्धशतक

 

अंबाती रायुडूचा भारतासाठी पहिला षटकार

 

भारतीय संघाची चौकाराने सुरुवात

 

शेहझादच्या तुफानी खेळीमुळे अफगाणिस्तानची आव्हानात्मक धावसंख्या

दुबई, आशियाच चषक 2018 : मोहम्मद शेहझादने साकारलेल्या तुफानी शतकामुळे अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 252 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. शेहझादने 116 चेंडूंत 11 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 124 धावांची खेळी साकारली. शेहझाद बाद झाल्यावर मोहम्मद नबीनेही भारताच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. नबीने 56 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 64 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. भारताकडून फिरकीपटू रवींद्र जडेजाने तीन आणि कुलदीप यादवने दोन बळी मिळवले.

 

अफगाणिस्तानचे भारतापुढे 253 धावांचे आव्हान

मोहम्मद नबी बाद, अफगाणिस्तानला आठवा धक्का

जडेजाने अफगाणिस्तानला दिला सातवा धक्का

 

अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचे अर्धशतक पूर्ण

भारताला मोठा दिलासा; शतकवीर मोहम्मद शेहझाद out 

 

अफगाणिस्तान 37 षटकांत 5 बाद 178 

मोहम्मद शेहझादचे धडाकेबाज शतक

 

अफगाणिस्तान 20 षटकांत 4 बाद 103 

अफगाणिस्तानला चौथा धक्का

 

रवींद्र जडेजाने भारताला मिळवून दिले दुसरे यश

 

धोनी-जडेजा जोडीने भारताला मिळवून दिले पहिले यश

 

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझादचे धडाकेबाज अर्धशतक

अफगाणिस्तानची दमदार सुरुवात, पाच षटकांत बिनबाद 35

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी महेंद्रसिंग धोनीला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी रोहित आणि धवन हे तंदुरुस्त असावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

 

धोनीचा कर्णधार म्हणून आहे हा 200वा सामना

 

दीपक चहारला मिळाली पदार्पणाची संधी

 

दोन्ही संघ

 

 

टॅग्स :आशिया चषकभारतअफगाणिस्तानमहेंद्रसिंह धोनीरोहित शर्माशिखर धवन