अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी युवा भारतीय संघाने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली कमाल करून दाखवली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या यूथ वनडेत दक्षिण आफ्रिकेला २३३ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने यजमानांना त्यांच्या घरात क्लीन स्वीप दिली. नियमित कर्णधार आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवत आगामी अंडर १९ वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युवा टीम इंडियानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेचा संघ १६० धावांतच आटोपला
दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी शहरातील विमोमूर पार्क स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशी १२७ (७४) आणि एरॉन जॉर्ज ११८ (१०६) यांनी केलेल्या शतकी धमाक्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा निर्णय फसवा ठरला. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३९३ धावा करत यजमान संघासमोर ३९४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३५ षटकांत १६० धावांतच आटोपला.
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
गोलंदाजीत किशन कुमार सिंहशिवाय मोहम्मद इनान चमकला
भारतीय संघाने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळतील फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. धावफलकावर अवघ्या ५० धावा असताना अर्धा संघ तंबूत परतला होता. डॅनियल बॉस्मन ४० (६०) पॉल जेम्स ४१ (४९), कॉर्नेलियस बोथा ३६ (३९) आणि जेसन रोवेल्स १९ (२१) हे चार फलंदाज वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून किशन कुमार सिंह याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद इनान याने २ विकेट्स घेतल्या.
वैभव सूर्यवंशीनं फलंदाजीसह कॅप्टन्सीतील विक्रमी कामगिरीसह गाजवली मालिका
१५ जानेवारीपासून होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने युवा टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण होती. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या जागी या यूथ वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशी याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. प्रत्येक सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर धमाकेदार कामगिरीसह विक्रमावर विक्रम रचणाऱ्या वैभवनं कॅप्टन्सीतही कमाल करून दाखवली. सर्वात कमी वयात यूथ वनडेत कॅप्टन्सी करणाऱ्या वैभवच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्याचित करत क्लीन स्वी दिली.