Australia U19 vs India U19, 2nd Youth Test : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय वरिष्ठ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी युवा टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दिवाळी आधी फटाके फोडले आहेत. युवा वनडे मालिकेनंतर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील भारतीय संघाने कसोटीतही ऑस्ट्रेलियन संघाला चारीमुंड्या चित केलं आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध भारत अंडर-१९ यांच्यातील दुसरा कसोटी सामना मॅकाय येील ग्रेट बॅरियर रीफ अरेना स्टेडियमवर रंगला होता. हा सामना ७ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेनंतर कसोटीत दिला व्हाइट वॉश
दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघातील १४ वर्षीय युवा सन्सेशन वैभव सूर्यवंशी दोन्ही डावात अपयशी ठरला. मात्र जलदगती गोलंदाज आणि फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना सहज खिशात घातला. याआधी पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि ५८ धावांनी पराभूत केले होते. कसोटी मालिकेआधी युवा टीम इंडियानं तीन सामन्यांची वनडे मालिका देखील ३-० अशी जिंकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुहेरी व्हाइट वॉशचा डाव साधत दिवाळी आधी फटाके फोडत मोठा धमाका केल्याचे दिसून आले.
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
ऑस्ट्रेलिया संघाने आघाडी घेतली, पण शेवटी पदरी पराभवच पडला
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियनं संघाचा पहिला डाव अवघ्या १३५ धावांत आटोपला होता. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १७१ धावा करत ३६ धावांची अल्प आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ ११६ धावांत आटोपल्यावर भारतीय संघाला ८१ धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्या हे आव्हान पार करत मालिका २-० अशी जिंकली. या सामन्यात वैभव सूर्यंवशी दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात २० धावांवर बाद झालेल्या वैभव सूर्यंवशीला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही.