Join us  

India Tour of South Africa : Breaking - भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी, कुठे दोन्ही संघ भिडणार

India Tour of South Africa : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 9:44 PM

Open in App

India Tour of South Africa : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबरपासून हा दौरा सुरू होणार होता, परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्यातील चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली.  भारतीय  संघ या दौऱ्यावर आता तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. २६ डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.  

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेतील तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय संघानं आज न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारतानं या विजयासह WTCमध्ये १२ गुण कमावले. त्यांच्या खात्यात एकूण ३ विजय, १ पराभव व २ ड्रॉ अशा निकालांसह ४२ गुण जमा झाले आहेत. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा वरचढ आहे. आता आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ मालिका विजय मिळवून  जागतिक कसोटीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.   

भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियनदुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्गतिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन

पहिली वन डे - १९ जानेवारी २०२२,  दुपारी २ वाजल्यापासून, पार्लदुसरी वन डे - २१ जानेवारी २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, पार्लतिसरी वन डे - २३ जानेवारी २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App