Join us

India Tour to South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची झाली घोषणा; जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22 : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयनं बुधवारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 11:21 IST

Open in App

Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22 : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयनं बुधवारी केली. तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका या दौऱ्यावर खेळवली जाणार आहे. भारत व दक्षिण आफ्रिका संघांनी केवळ कसोटी संघच जाहीर केले आहेत. त्यामुळे वन डे संघात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता लागली आहे. भारतानं जाहीर केलेल्या कसोटी संघात उप कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडून काढून घेतले गेले. रोहित शर्माकडे ही जबाबदारी दिली गेली आहे. याशिवाय भारतीय संघात आणखी काही बदल पाहायला मिळत आहेत. 

भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या हनुमा विहारीनं तीन सामन्यांत २१४ धावा केल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याची निवड होणे साहजिक होते. अजिंक्य, चेतेश्वर पुजाराइशांत शर्मा यांच्याकडे अनुभव असला तरी ते सातत्यानं अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असणार आहे. मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज हे त्यांची जागा घेण्यासाठी तयार आहेत.

दोन्ही संघ भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार),  रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा,  मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला  

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ - डिल एल्गर, टेम्बा बवुमा, क्विंट डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एर्वी, बेयूरन हेंड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, अॅनरिच नॉर्ट्जे, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन, मार्का जान्सेन,  ग्लेंटन स्टुर्मन, प्रेनेलान सुब्रायेन, सिसांडा मगाला, रियान रिकेल्टन, ड्युन ऑलिव्हर  

भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियनदुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्गतिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजाराइशांत शर्मा
Open in App