Join us

India tour of New Zealand 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियातून थेट 'शेजारील' देश गाठणार, BCCI खेळाडूंना दमवणार 

India tour of New Zealand 2022 : कोरोनाचं संकट हळुहळू दूर झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर तर BCCI ने भारतीय खेळाडूंची दमछाक करून घेण्याचा सपाटाच लावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:12 IST

Open in App

India tour of New Zealand 2022 : कोरोनाचं संकट हळुहळू दूर झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर तर BCCI ने भारतीय खेळाडूंची दमछाक करून घेण्याचा सपाटाच लावला आहे. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, आशिया कप अशा सलग मालिका भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत खेळायच्या आहेत. त्यानंतरही हे दमवणारे वेळापत्रक कायम राहणार आहे. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यानंतर लगेचच ५ दिवसांनी टीम इंडियाला तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन

 ट्वेंटी-२० मालिका 

  • पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
  • दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
  • तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज

 

वन डे मालिका 

  • पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
  • दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
  • तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

भारताचा विंडीज दौरा

  • पहिली वन डे - २२ जुलै
  • दुसरी वन डे - २४ जुलै
  • तिसरी वन डे - २७ जुलै
  • पहिली ट्वेंटी-२० - २९ जुलै
  • दुसरी ट्वेंटी-२० - १ ऑगस्ट
  • तिसरी ट्वेंटी-२० - २ ऑगस्ट
  • चौथी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट
  • पाचवी ट्वेंटी-२० - ७ ऑगस्ट 

 

यानंतर श्रीलंका, झिम्बाब्वे व आशिया चषक अशा मालिका आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आहेच. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

  • 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
  • 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
  • 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
  • 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • १३ नोव्हेंबरला अंतिम सामना

भारताचा न्यूझीलंड दौरा ( India tour of New Zealand 2022)

  • १८ नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-२०
  • २० नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-२० 
  • २२ नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-२०  
  • २५  नोव्हेंबर - पहिली वन डे
  • २७ नोव्हेंबर - दुसरी वन डे
  • ३० नोव्हेंबर - तिसरी वन डे 
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App