Join us

India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय!

India Tour of England: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 10:34 IST

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयनं त्यांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा यासाठी २० दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू कुटुंबीयांसोबत भटकंती करताना दिसत आहेत. ४ ऑगस्टला सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शुबमन गिल याला दुखापत झाली असून तो संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( opener Shubman Gill has suffered an internal leg injury and is doubtful for the entire 5 match test series ) अभिमन्यू इस्वरन हा राखीव सलामीवीर संघासोबत आहे आणि गिलच्या अनुपस्थितीत इस्वरनचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. 

Rohit Sharma sells Lonavla property : रोहित शर्मानं विकली लोणावळा येथील प्रॉपर्टी; किंमत जाणून व्हाल हैराण

शुबमन गिलला काल्फ मसल दुखापत किंवा हॅमस्ट्रींग दुखापत झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही दुखापत त्याला केव्हा झाली, याबाबतही काहीच कल्पना नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये सराव करताना गिलला ही दुखापत झाली आहे, परंतु अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ''इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यास अजून महिना बाकी आहे, परंतु शुबमन गिल संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं PTI ला सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या WTC फायनलमध्ये गिलला २८ व ८ धावा करता आल्या होत्या.   

हनुमा विहारी किंवा मयांक अग्रवाल हे सलामीला पर्याय, तर लोकेश राहुल मधल्या फळीत खेळणारशुबमन गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडिया रोहित शर्मासोबत सलामीसाठी हनुमा विहारी किंवा मयांक अग्रवाल यांचा विचार करण्याची शक्यता आहे. लोकेश राहुलला मधल्या फळीत संधी देण्याची शक्यता आहे. 

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

भारत-इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम ( ४ ते ८ ऑगस्ट), लॉर्ड्स ( १२ ते १६ ऑगस्ट), लीड्स ( २५ ते २९ ऑगस्ट), ओव्हल ( २ ते ६ सप्टेंबर) आणि मँचेस्टर ( १० ते १४ सप्टेंबर) असे पाच कसोटी सामने होणार आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलमयांक अग्रवाललोकेश राहुल