Join us  

India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक!

India Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 5:32 PM

Open in App
ठळक मुद्देशबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांनी दुखापतीमुळे घेतली दौऱ्यातून माघारयष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

India Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली, पण ट्वेंटी-२० मालिका टीम इंडियाला गमवावी लागली. संजू सॅमसन, मनिष पांडे यांना संधी मिळूनही सोनं करता आलं नाही. पृथ्वी शॉ, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी निवड समितीचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्याचे अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जून महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर खेळाडूंनी मिळालेल्या २० दिवसांच्या सुट्टीत धम्माल मस्ती केली आहे. आता चार दिवसांनंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल आणि टीम इंडियाची खरी 'कसोटी' सुरू होईल.

पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड! 

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठे धक्के बसले आहेत. त्यातून सावरत टीम इंडिया ४ ऑगस्टला मैदानावर उतरणार आहे. WTC Final नंतर टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला अन् त्याला मायदेशात परत यावे लागले. त्यानंतर बीसीसीआयनं दिलेल्या सुट्टीत खेळाडूंनी विम्बल्डन, युरो स्पर्धा थेट स्टेडियमवर जाऊन पाहिली. त्याचा फटका संघाला बसलाच... यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह झाला अन् त्याला विलगिकरणात जावे लागले. त्याच्यासोबत वृद्धीमान सहा व अभिमन्यू इस्वरन यांनाही विलगिकरणात जावे लागले. हे सर्व आता तंदुरुस्त होऊन संघासोबत सरावाला लागले आहेत.

तीन दिवसांच्या सराव सामन्यात लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी आणि उमेश यादव वगळता अन्य खेळाडूंना फार ग्रेट कामगिरी करता आली नाही. त्यात वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान यांना दुखापत झाली आणि त्यांनीही मालिकेतून माघार घेतली. त्यात त्यांना बदली खेळाडू म्हणून निवड झालेल्या पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांनाही विलगिकरणात जावे लागले आहे. श्रीलंका दौऱ्यावर कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंमध्ये पृथ्वी व सूर्यकुमारचा समावेश होता. त्यामुळे त्यांचाही इंग्लंड दौरा संकटात आला आहे. 

१३ वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी२००७ नंतर टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. २००७मध्ये भारतानं इथे कसोटी मालिका जिंकली होती आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची विराट अँड कंपनीला संधी आहे. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया नॉटिंग्हॅमला पोहोचली आहे.  ( Team India reaches Nottingham ahead of the 1st Test against England starting from Wednesday) 

जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक अन् संघ ( India Tour of England) 

भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव. ( India’s squad: Rohit Sharma, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Virat Kohli (Captain), Ajinkya Rahane (vice-captain), Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), R. Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Jasprit Bumrah, Ishant Sharma, Mohd. Shami, Md. Siraj, Shardul Thakur, Umesh Yadav, KL Rahul, Wriddhiman Saha (wicket-keeper), Abhimanyu Easwaran) राखीव खेळाडू - प्रसिद्ध कृष्णा, अर्झान नागवासवाला ( Standby players: Prasidh Krishna, Arzan Nagwaswalla)इंग्लंडचा संघ ( पहिल्या दोन कसोटींसाठी ) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड ( England squad (2 Tests): Joe Root (c), Ben Stokes, Rory Burns, Dominic Sibley, Jos Buttler, Mark Wood, Sam Curran, James Anderson, Jonny Bairstow, Dominic Bess, Stuart Broad, Zak Crawley, Haseeb Hameed, Dan Lawrence, Jack Leach, Ollie Pope, Ollie Robinson.) 

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक ( सामने दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू) ४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलवॉशिंग्टन सुंदरपृथ्वी शॉसूर्यकुमार अशोक यादव
Open in App