Join us  

India Tour of Australia : स्टीव्ह स्मिथनं सुरू केला माईंड गेम; टीम इंडियाच्या गोलंदाजांना दिलं चॅलेंज!

मागच्या वेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या आव्हानाचा सामना करता आला नव्हता. बॉल टॅम्परींग प्रकरणामुळे दोघांवरही एका वर्षांची बंदी घातली गेली होती.

By स्वदेश घाणेकर | Published: November 14, 2020 5:16 PM

Open in App

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका ही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीत उतरणारी गोष्ट... ऑसी खेळाडूंची स्लेजिंग अन् भारतीय खेळाडूंचं त्यात तोडीचं उत्तर, यांनी नेहमीच चर्चेला विषय दिला. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर यंदाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या या दौऱ्यावर भारतीय संघाकडून सर्वांना प्रचंड अपेक्षा आहेत. 27 नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि ऑसी संघातील प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) यानं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आव्हान देताना माईंड गेम सुरू केला आहे.

मागच्या वेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या आव्हानाचा सामना करता आला नव्हता. बॉल टॅम्परींग प्रकरणामुळे दोघांवरही एका वर्षांची बंदी घातली गेली होती. पण, यंदाच्या दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांसमोर या दोघांचे प्रमुख आव्हान असणार आहे. कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी स्मिथनं माईंड गेम खेळताना भारतीय गोलंदाजांना शॉर्ट बॉल टाकण्याचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर शॉर्ट बॉलवर खेळताना स्मिथ चाचपडला होता. नील वॅगनर त्याला सहज बाद करत होता. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजही शॉर्ट बॉलचाच मारा करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज स्मिथनं लावला आहे आणि     त्यामुळेच त्यानं आव्हान दिलं आहे.

दरम्यान, स्मिथनं आव्हानासाठी सज्ज असल्याचे सांगितले. भारतीय गोलंदाज शॉर्ट बॉल व बाऊन्सरचा सातत्यानं मारा करतील आणि त्यानं आम्हालाच मदत होईल, असा दावाही त्यानं केला. ''माझ्यासाठी हा कोणताच ड्रामा नाही. मला बाद करण्यासाठी ते कसा प्रयत्न करतात आणि त्याला मी कसं उत्तर देतो, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. काही वेगळ्या प्रतिस्पर्धींनी मला शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु जे वॅगनरला जमलं, ते इतरांना करणे शक्य झालं नाही. वॅगनरकडे गतीसह अमेझिंग कौशल्य आहे,''असे स्मिथ म्हणाला. 

तो पुढे म्हणाला,''भारतीय गोलंदाजांनीही मला शॉर्ट बॉल टाकून बाद करण्याचा प्लान केला असेल तर तो माझ्यासंघासाठी फायद्याचा ठरेल. अख्या आयुष्यात मी सर्वाधिक शॉर्ट बॉलचा सामना केला आहे आणि त्यामुळे मला काही अडचण होत नाही. वेट अँड सी.''

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया