रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली

MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 13, 2020 05:47 PM2020-11-13T17:47:28+5:302020-11-13T17:48:01+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of Australia : Rohit Sharma still only '70% fit', says Sourav Ganguly | रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली

रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चार सामन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020)  सामने खेळला अन् अंतिम सामन्यात सिंहाचा वाटा उचलताना मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पाचवे जेतेपद पटकावून दिले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे BCCIनंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात सुरुवातीला रोहितच्या नावाचा समावेश केला नव्हता. पण, मुंबई इंडियन्ससाठी मैदानावर उतरलेल्या रोहितला पाहून बीसीसीआयनं सुधारित संघ जाहीर करून रोहितचा फक्त कसोटी मालिकेसाठीच्या संघात समावेश केला. ट्वेंटी-20 व वन डे सामन्यांत जबरदस्त रेकॉर्ड असताना रोहितला फक्त कसोटी मालिकेसाठीच का निवडले, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे उत्तर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं ( Sourav Ganguly) दिले.

रोहित शर्मा वगळता टीम इंडियाचे सर्व शिलेदार गुरुवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले. रोहित मुंबईत परतला असून दिवाळीनंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी जाणार आहे. पण, आयपीएल फायनलमध्ये तुफान फटकेबाजी करणारा रोहित अजूनही तंदुरूस्त नसल्याच्या वृत्तावर चाहत्यांचा विश्वास बसत नाही. सौरव गांगुलीनं त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात दिली. ''रोहित शर्मा अजून फक्त ७० टक्केच तंदुरूस्त आहे,''अशी माहिती गांगुलीनं दिली. तो पुढे म्हणाला,''तुम्ही हा प्रश्न रोहितलाच का विचारत नाही? तो पूर्णपणे फिट नाही, म्हणून त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघात स्थान मिळालेले नाही. त्याचा कसोटी संघात समावेश केला आहे.''

MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला. DCविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहितनं अर्धशतकी खेळी केली. रोहितच्या दुखापतीबाबत गांगुलीनं ३ नोव्हेंबरला सांगितले होते की,''रोहित सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त आहे. नाहीतर त्याच्यासारख्या खेळाडूला आम्ही का बसवू? भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा तो उपकर्णधार आहे. त्याच्या तंदुरुस्तीवर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. त्याच्यासारख्या खेळाडूनं लवकर बरे व्हावे, ही आमची इच्छा आहे.''

सुधारित संघ ( Revised Team For Australia Tour )
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन

कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

Web Title: India Tour of Australia : Rohit Sharma still only '70% fit', says Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.