Join us  

India vs Australia : कसोटीपाठोपाठ वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेच्याही तारखा ठरल्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेनंतर होणार वर्ल्ड कप...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:57 PM

Open in App
ठळक मुद्देतीन वन डे, चार कसोटी आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका

कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं भविष्य टांगणीला लागलेलं असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बुधवारी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतानं 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमानांना पराभूत करून इतिहास रचला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियान ती मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्याचा वचपा काढण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 3 डिसेंबरला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडिलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.  ऑस्ट्रेलियाच्या समर क्रिकेटची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या डे-नाईट कसोटीनं होणार आहे. 21 नोव्हेंबरला वाका येथे ही कसोटी खेळवण्यात येईल. चार कसोटी सामन्यांसह टीम इंडिया येथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. ट्वेंटी-20 सामन्यांनी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे, त्यानंतर कसोटी आणि मग वन डे मालिका होईल. कसोटी मालिकेचं वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर केले गेले आहे, परंतु ट्वेंटी-20 आणि वन डे चं वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. ऑस्ट्रेलियन मीडियानं त्या तारखा जाहीर केल्या आहेत. ट्वेंटी-20 मालिकेनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी व वन डे मालिका होईल.

पाहा संपूर्ण वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका11 ऑक्टोबर - ब्रिस्बेन14 ऑक्टोबर - कॅनबेरा17 ऑक्टोबर - अॅडलेड कसोटी मालिकावि. भारत, गॅबा, 3 ते 7 डिसेंबरवि. भारत, अॅडलेड, 11 ते 15  डिसेंबरवि. भारत, मेलबर्न, 26- 30 डिसेंबरवि. भारत, सिडनी, 3 ते 7 जानेवारी 2021वन डे मालिका12 जानेवारी 2021 - पर्थ15 जानेवारी 2021 - मेलबर्न17 जानेवारी 2021 - सीडनी  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन

IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव 

MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय

आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...

सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ