India T20 Captaincy: मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानची ०/१५२ आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडची ०/१७० ही धावसंख्या भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागणारी आहे. दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला प्रतिस्पर्धींनी सहज पराभूत केले. एडिलेडवर काल झालेल्या उपांत्य फेरीत जोस बटलर व ॲलेक्स हेल्स या दोघांनीच भारताचे १६९ धावांचे लक्ष्य सहज पार करून ऐटीत फायनलमध्ये प्रवेश केला. मागील वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली आणि त्यानंतर भारताची ट्वेंटी-२०तील कामगिरीही चांगली झाली. पण, आयसीसी स्पर्धांमध्ये दबाव झेलण्यास पुन्हा एकदा भारतीय खेळाडू असमर्थ ठरले आणि इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारला. भारताच्या या पराभवानंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये आली आहे. वर्ल्ड कप गमावल्यानंतर आता रोहित शर्मा ( Rohit Sharma) कर्णधारपदही गमावणार असल्याचे संकेत BCCI कडून देण्यात आले आहेत.
सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य
पॉवर प्लेमध्ये अतिशय संथ खेळ, यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात आल्या नाही. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या ट्वेंटी-२०त भारतीय फलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत ९च्या सरासरीने धावा केल्या होत्या, परंतु वर्ल्ड कपमध्ये ही सरासरी ६च्या आसपास राहिली. लोकेश राहुल व रोहित शर्मा हे दोघंही दडपणाखाली चांगला खेळ करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव व विराट कोहली या दोघांवर भारतीय संघ विसंबून होता. दिनेश कार्तिकने मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही, रिषभला पुरेशी संधी मिळाली नाही. अक्षर पटेल अष्टपैलू म्हणून खेळला की केवळ फिरकीपटू हेच समजले नाही. आर अश्विनला त्याची जबाबदारी स्पष्टपणे माहितच नसल्याचे दिसले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"