T20 World Cup, IND vs ENG : सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीची मागणी समोर येताना दिसतेय.. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तसे भाकित केले, त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मोठे भाकित केले. ( Rahul Dravid addresses the post match press conference)

T20 World Cup, India vs England Semi Final Live : भारतीय संघाने आज पूर्णपणे निराश केले. रोहित शर्मा अँड कंपनीने मोक्याच्या क्षणी मान टाकली. विराट कोहलीने अर्धशतक झळकावताना तीन विश्वविक्रम नोंदवले, परंतु त्याची खेळी फारच संथ होती. हार्दिक पांड्याने फटकेबाजी करून भारताची इभ्रत वाचली होती.

पण गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांची कामगिरी आज टीका करण्यासाखीच झाली. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर सीनियर्स खेळाडूंच्या निवृत्तीची मागणी समोर येताना दिसतेय.. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तसे भाकित केले, त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मोठे भाकित केले. ( Rahul Dravid addresses the post match press conference)

विराट कोहली ( ५०) व हार्दिक पांड्या ( ६३*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलरने ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८० व हेल्सने ४७ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ केल्या. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि १५ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अधुरे राहिले.

सामन्यानंतर राहुल द्रविड पत्रकारांना उत्तर देण्यासाठी समोर आला. तो म्हणाला, नक्कीच आजच्या कामगिरीवर निराश आहे. आम्हाला आणखी दोन विजय मिळवून जेतेपदासह स्पर्धेचा निरोप घ्यायला आवडले असते, परंतु आज आम्ही अपयशी ठरलो. पण, संपूर्ण स्पर्धेचा विचार कराल, तर संघाची कामगिरी चांगली झाली. मागील वर्षभरात आम्ही चांगले ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलो आणि या स्पर्धेत तो क्षण आम्ही निर्माण केला होता. उपांत्य फेरीतील पराभव नैराश्य आणणारा आहे, याची कल्पना आहे. पण, या पराभवातून शिकून पुढे खेळात सुधारणा करायला हवी आणि पुढे चालायला हवं.'

द्रविड पुढे म्हणाला, आम्ही १५-२० धावा कमी केल्या. हार्दिकने दमदार खेळ करून सन्मानजनक धावा उभ्या केल्या. आज १८५-१९० धावा व्हायला हव्या होत्या. हेल्स व बटलर यांच्या भागीदारीचे कौतुक करायला हवे. त्यांनी एकही संधी दिली नाही आणि त्यांनी फिरकीवरही चांगला खेळ केला. इंग्लंडला अशी सुरुवात मिळाल्यानंतर त्यांनी सामन्यावर मजबूत पकड घेतली. पण १० विकेट्सने हार ही निराशाजनक गोष्ट आहे. ''

त्याने पुढे म्हटले की, भारतीय खेळाडूंना परदेशातील खेळपट्टींवर खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी त्यांना विविध लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला हवी का, हा चर्चेचा विषय आहे. इंग्लंडच्या बऱ्याच खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील BBL मध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पण, भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली, तर आपलं स्थानिक क्रिकेट आणि रणजी करंडक हे संपून जातील. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या बाबतीत हे घडताना आम्ही पाहिले आहे.

सीनियर खेळाडूंनी आता निवृत्ती घ्यावी का या प्रश्नावर द्रविड म्हणाला, सीनियर खेळाडूंच्या भविष्याबाबत आताच बोलणे हे खूप घाईचे ठरेल. ही ती वेळ नाही आणि या गोष्टीचा आता विचार करायला नको. भारताकडे पुढील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याकरिता पुरेसा वेळ आहे.