India Playing XI vs NZ 1st ODI: ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतात २०२३मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीलाही याच मालिकेतून सुरुवात होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आदी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे, परंतु युवा खेळाडूंना संधी देऊन मजबूत फळी निर्माण करण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पटकावण्यासाठी उम्रान मलिक व अर्शदीप यांच्यात टक्कर पाहायला मिळेल. कुलदीप सेन हाही पर्याय कर्णधार शिखर धवनसमोर आहे. या मालिकेत संजू सॅमसनला ( Sanju Samson) संधी मिळते का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
![]()
उम्रान मलिकचे टीम इंडियात पुनरागमन झाले, परंतु ट्वेंटी-२० मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. दुसरीकडे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या अर्शदीप सिंगला दोन्ही लढतीत संधी मिळाली. पण, आता वन डे मालिकेत उम्रानला संधी देण्याच्या विचारात प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण आहे. फलंदाजी विभागात सूर्यकुमार यादव वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी सज्ज आहे. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. दीपक हुडा व संजू सॅमसन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. ट्वेंटी-२० मालिकेत संजूला बाकावरच बसवून ठेवण्यात आले. पण, त्याच्याकडे वन डे संघाचा भाग म्हणून पाहिले जात आहे आणि त्याला संधी मिळू शकते.
![]()
- शिखर धवन आणि शुबमन गिल ही जोडी सलामीला येऊ शकते
- विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर हा सक्षम पर्याय आहे
- सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा मुख्य फलंदाज आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो लोकेश राहुलला टक्कर देऊ शकतो
- रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल, परंतु त्याच्या कामगिरीवर सर्वकाही अवलंबून आहे.
- सहाव्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. इथे अष्टपैलूची गरज आहे, परंतु संजू सॅमसनही शर्यतीत आहे
![]()
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन
शुबमन गिल
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
रिषभ पंत ( यष्टीरक्षक)
संजू सॅमसन
दीपक चहर
शार्दूल ठाकूर
अर्शदीप सिंग/उम्रान मलिक
कुलदीप यादव
युजवेंद्र चहल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"