Join us

India Playing XI 2nd ODI vs BAN : टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू म्हणून खेळवला अन् आता दुखापतीमुळे संघाबाहेर बसला

India Playing XI 2nd ODI vs BAN Live : बांगलादेशने पहिल्या सामन्यात १ विकेटने रोमहर्षक विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 11:32 IST

Open in App

India Playing XI 2nd ODI vs BAN Live : बांगलादेशने पहिल्या सामन्यात १ विकेटने रोमहर्षक विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या वन डेतील लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्यासाठी उद्या मैदानावर उतरणार आहे, परंतु त्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, रिषभ पंत यांनी दुखापतीमुळे मालिका सुरू होण्याआधीच माघार घेतली आणि त्यात आणखी एकाची भर पडली आहे. भारताने पहिल्या वन डेत चार अष्टपैलू खेळवलं आणि त्यापैकी एक शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) हाही दुखापतग्रस्त झाला आहे. मीरपूर सामन्यात पहिल्या स्पेलनंतर त्याचा पाय मुरगळला आहे आणि त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

BCCI ची वैद्यकिय टीम शार्दूलच्या दुखापतीवर उपचार करत आहे आणि त्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू आहे. दुसऱ्या वन डे सामन्यांत उम्रान मलिक ( Umran Malik) याला संधी मिळण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन शार्दूलच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नसेल, तर उम्रानला संधी मिळणार नाही. शार्दूलला पहिल्या सामन्यात क्रॅम्प आला. शार्दूल कसोटी संघाचाही सदस्य आहे आणि त्यात शमी तंदुरुस्त नसल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. बीसीसीआयने शमीच्या जागी वन डे मालिकेसाठी उम्रानची आधीच निवड केली आहे.  

अक्षर पटेल हाही पहिल्या वन डे सान्यात दुखापतीमुळे खेळता नव्हता आणि तो ढाका येथे बुधवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर शाहबाज अहमदला बाकावर बसावे लागेल. 

भारताचा संभाव्य संघ रोहित शर्मा शिखर धवनविराट कोहली श्रेयस अय्यरलोकेश राहुलवॉशिंग्टन सुंदरशाहबाज अहमद/अक्षर पटेलशार्दूल ठाकूर/उम्रान मलिकदीपक चहरमोहम्मद सिराज कुलदीप  सेन 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशशार्दुल ठाकूरबीसीसीआय
Open in App