Join us

भारत-पाकिस्तान! इंटरनेटवर क्रिकेटविश्वातील आजवर सर्वाधिक व्हायरल झालेला फोटो 

मुलीला सहकारी खेळाडूंकडे सोपवून मरूफ मैदानावर उतरली. सामन्यानंतर भारतीय खेळाडू एकता बिस्त ही पाकिस्तानी ड्रेसिंग रुमच्या समोर उभ्या असलेल्या तिच्या मुलीसोबत खेळताना दिसली आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 05:37 IST

Open in App

माउंट मोन्गानुई : भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामन्यासोबतच अनेकांची मनेही जिंकली. हा सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार मरूफ बिस्माह ही तिच्या लहान बाळासह मैदानावर दाखल झाली होती. 

मुलीला सहकारी खेळाडूंकडे सोपवून मरूफ मैदानावर उतरली. सामन्यानंतर भारतीय खेळाडू एकता बिस्त ही पाकिस्तानी ड्रेसिंग रुमच्या समोर उभ्या असलेल्या तिच्या मुलीसोबत खेळताना दिसली आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला. 

यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी बिस्माह आणि तिच्या मुलीसोबत सेल्फी काढला. मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांनी मैदानाबाहेर मात्र प्रेमाचा संदेश दिला. सध्या भारतीय संघाचे आणि एकता बिस्तचे या कृतीसाठी सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :भारतपाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App