'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील IPL 2025 चा सामना रद्द करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 00:27 IST2025-05-09T00:27:10+5:302025-05-09T00:27:50+5:30

whatsapp join usJoin us
India Pakistan Tension: 'I am in my country, what am I afraid of...' cricket fan video viral | 'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Pakistan Tension: दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील IPL 2025 चा सामना भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ला चढवला, भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे धर्मशाला मैदानात रंगलेला सामना थांबण्यात आला आहे. यानंतर मैदानातील सर्व प्रेक्षकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यावेळी एका प्रेक्षकाने मीडियाला दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे.

आज धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स आमि पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू होता. पंजाबने पहिल्यांदा बॅटिंग करताना 10 षटकात एक विकेट गमावून 122 धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानने भारतावर अचानक हवाई हल्ला केल्यामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर मैदानातील सर्व प्रेक्षकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. यावेळी एका प्रेक्षकांनी एनएनआय वृत्तसंस्थेला दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

पाहा व्हिडिओ...

व्हिडिओमध्ये एका प्रेक्षकाला विचारण्यात आले की, सामना अचानक का थांबवला? त्यावर तो म्हणतो, सुरक्षेच्या कारणास्तवर सामना थांबवण्यात आला. पुढे त्याला विचारण्यात आले की, भीती वाटतेय का? त्यावर त्या प्रेक्षकाने भन्नाट उत्तर दिले. तो म्हणतो, भीती वाटण्याचे काय कारण? मी माझ्या देशात आहे. भीती वाटायचीच असेल, तर ती पाकिस्तानला वाटली पाहिजे. भारत माता की जय..., अशी प्रतिक्रिया त्या प्रेक्षाने दिली. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

IPL चे उर्वरित सामने रद्द होणार?
या सामन्यानंतर आयपीएल स्पर्धा  स्थिगित केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) बैठक सुरु असल्याचे समजते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक  परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना सुरक्षित घरी पाठवणे ही देखील  बीसीसीआयची पहिली प्राथमिकता असेल. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: India Pakistan Tension: 'I am in my country, what am I afraid of...' cricket fan video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.