Join us  

T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात

T20 World Cup : आयसीसीने जाहीर केले गट. पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 9:38 AM

Open in App
ठळक मुद्देआयसीसीने जाहीर केले गट. पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील. 

दुबई : भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या २०-२० विश्वचषकासाठी आयसीसीने शुक्रवारी सहभागी संघांचे गट जाहीर केले. यानुसार हे दोन्ही संघ एकाच गटात असून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचादेखीेल याच गटात समावेश करण्यात आला आहे.

अन्य गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. गटातील अन्य संघांचा निर्णय विश्वचषक पात्रता फेरीच्या निकालानंतर होणार आहे. विश्वचषकाचे सामने १४ नोव्हेंबरपर्यंत चालतील. पात्रता सामन्यासह एकूण ४५ सामने खेळविले जातील. पात्रता फेरीत १२, सुपर १२ फेरीत ३० आणि दोन उपांत्य तसेच एका अंतिम सामन्याचा यात समावेश आहे.

असे होतील सामने...सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

२००९, २०१० ला नव्हते झाले भारत- पाक सामनेभारत- पाकिस्तान सामना आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील सर्वांत उत्कंठापूर्ण आणि सर्वाधिक पाहिला जाणारा सामना असतो. आतापर्यंत झालेल्या सहा टी-२० विश्वचषकात केवळ दोनदा २००९ आणि २०१० मध्ये उभय संघांदरम्यान सामने झाले नव्हते. २००७ च्या विश्वचषकात तर फायनलसह उभय संघात दोनदा सामने झाले होते. २०१२ ला दोन्ही संघ सुपर ८ फेरीत परस्परांविरुद्ध खेळले. २०१४ आणि २०१६ ला भारत- पाक यांच्यात गटात सामने झाले होते.

पात्रता फेरीत सहभागी संघगट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबियागट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमा

सुपर १२ फेरीतील संघगट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

टॅग्स :भारतपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१दुबईआयसीसी