Join us

"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !

DGMO, Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने आज अचानक कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली, त्यावर DGMO यांनी भाष्य केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:51 IST

Open in App

India DGMO mentioned Virat Kohli Test Retirement: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय सैन्याकडून सातत्याने याबाबत माहिती देण्यात येत आहे. आज भारतीय सैन्यदलातील तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी DGMO सह 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तान तणावाबाबत सध्याच्या परिस्थितीबद्दल पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारताचे DGMO राजीव घई यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचाही उल्लेख केला.

भारताच्या DGMO कडून विराट कोहलीचा उल्लेख

"आमच्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सना लक्ष्य करणे खूप कठीण आहे. आपल्या अभेद्य फळीबद्दल बोलताना मी क्रिकेटमधील एक किस्सा सांगू शकतो. आज तर आपण क्रिकेटबद्दल बोललेच पाहिजे. कारण मी पाहिले की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इतर भारतीयांप्रमाणेच तो देखील माझ्या आवडत्या क्रिकेटर्सपैकी एक आहे," असे म्हणत मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणाले.

यावेळी त्यांनी क्रिकेटचा किस्साही सांगितला. "१९७० च्या दशकात, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील अ‍ॅशेस दरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी लाइनअप उद्ध्वस्त केली आणि नंतर ऑस्ट्रेलियाने एक म्हण दिली - "राख ती राखच, धूळ ती धूळच, जर थॉम्पसनला यथ मिळाले नाही तरीही डेनिस लिली नक्कीच यशस्वी ठरेल. जर तुम्ही आपल्या सुरक्षेच्या लेव्हल पाहिल्यात तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते समजेल. जरी तुम्ही सर्व लेव्हल ओलांडलेत, तरी या ग्रिड सिस्टमचा एक थर तुमच्यावर आदळेल आणि शत्रुला दणका देईल," असे त्यांनी सांगितले

टॅग्स :विराट कोहलीऑपरेशन सिंदूरभारतीय जवानपहलगाम दहशतवादी हल्ला