Join us

पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

Ceasefire violation by pakistan: पाकिस्तानने युद्धविराम जाहीर झाल्यानंतर 3 तासांच्या आत उल्लंघन केले आणि भारतावर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:09 IST

Open in App

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती शिथील झाली आहे. काल दोन्ही देशांनी युद्धविराम करण्यास होकार दिला. पण, ते म्हणतात ना, 'कुत्र्याचे शेपूट वाकडे.' ही म्हण पाकिस्तानला अगदी योग्य बसते. कारण, शस्त्रसंधीच्या 3 तासांच्या आत पाकिस्तानने युद्धविरामचे उल्लंघन केले आणि भारतातील काही शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. हे हल्लेदेखील भारतीय सैन्याने परतून लावले. दरम्यान, आता पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यावर काही भारतीय क्रिकेटपटूंनी तीव्र संताप व्यक्त केला आणि पाकिस्तानची तुलना कुत्र्याशी केली.

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची तुलना कुत्र्याशी केली. शनिवारी युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांनीही पाकिस्तानविरुद्ध आपला राग व्यक्त केला. 

कुत्र्याचे शेपूट वाकडेच...वीरेंद्र सेहवाग नेहमीच सोशल मीडियावर आपले विचार उघडपणे मांडतो. पाकिस्तानने युद्धविरामचे उल्लंघन केले, तेव्हा सेहवागने एक पोस्ट शेअर केली. त्यावर लिहिले होते, "कुत्र्याचे शेपूट नेहमीच वाकडेच राहते." या म्हणीचा अर्थ असा आहे की, काही गोष्टी, जसे की स्वभाव किंवा सवयी, तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी सहजासहजी बदलत नाहीत. 

शिखर धवन काय म्हणाला?माजी क्रिकेटपटू शिखर धवनने ट्विट केले की, "या बेकार देशाने पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आपला रंद दाखवून दिला आहे." 

इतर क्रिकेटपटूंनीही व्यक्त केला राग

राहुल तेवतिया आणि युजवेंद्र चहल यांनीही इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि पाकिस्तानच्या या कृतींवर संताप व्यक्त केला. त्यांनी वाकड्या शेपटीच्या कुत्र्याचे तेच पोस्टर शेअर केले जे सेहवागने शेअर केले होते.

पाकिस्तानने दाखवला आपला खरा रंगजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेवर प्रचंड गोळीबार केला, ज्यात काही भारतीयांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय सैन्याने पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. यानंतर शनिवार(10 मे) रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला, परंतु 3 तासांच्या आतच पाकिस्तानने आपले खरे रंग दाखवत उल्लंघन केले.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लाशस्त्रसंधी उल्लंघनशिखर धवनविरेंद्र सेहवागयुजवेंद्र चहलपाकिस्तानकुत्रा