Join us  

Krunal Pandya Twitter: Bitcoinसाठी अकाऊंट विकतोय कृणाल पांड्या; Deepak Hooda च्या टीम इंडियातील निवडीशी लावला जातोय संबंध; जाणून घ्या नेमकं प्रकरण

भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) याच्या ट्विटर अकाऊंटवर सकाळी ७.३१ वाजल्यापासून धडाधड चार ट्विट पोस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 9:57 AM

Open in App

भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) याच्या ट्विटर अकाऊंटवर सकाळी ७.३१ वाजल्यापासून धडाधड चार ट्विट पोस्ट झाले. यापैकी एका पोस्टमध्ये तो बिटकॉईनसाठी अकाऊंट विकत असल्याचे म्हणत आहे. त्याच्या अकाऊंटवरून असे ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्याचं अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण नेटिझन्सना मीम्स बनवण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी दीपक हुडाची निवड ( Deepak Hooda) निवड झाल्यामुळे कृणाल वेडा झाला असल्याचीही चर्चा रंगली. कृणाल आणि दीपक हुडा यांच्यातला वाद जगजाहीर आहे. त्यात हुडाला टीम इंडियात संधी मिळाल्यामुळे कृणाल असं करतोय, अशी चर्चा नेटिझन्सनी सुरु केली. 

कृणालनं भारताकडून ५ वन डे व १९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. तो स्थानिक क्रिकेटमध्ये बदोडा संघाकडून अखेरचा विजय हजारे ट्रॉफी २०२२मध्ये खेळताना दिसला होता.   

कृणाल VS दीपक नेमकं काय आहे भांडण?सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२०त बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला होता. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली होती आणि त्यानं कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली होती. वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले. 

दीपक हुडाची कामगिरी...दीपकनं ४६ प्रथम श्रेणी, ६८ लिस्ट ए आणि १२३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. दीपक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. आयपीएल २०२१मध्ये दीपकनं ८ सामन्यांत ११६ धावा चोपल्या होत्या. दीपक हुडानं आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या होत्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या. 

टॅग्स :क्रुणाल पांड्याभारतीय क्रिकेट संघट्विटर
Open in App