Join us  

'हे' 3 स्टार प्लेयर्स होऊ शकतात वनडे संघाचे उपकर्णधार; रोहित शर्मासोबत सांभाळणार जबाबदारी

रोहित शर्माची भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नुयुक्ती केली आहे. यापूर्वी रोहितला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल, यासंदर्भात चर्चा होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 12:22 PM

Open in App

नवी दिल्ली - बीसीसीआयने नुकतेच विराट कोहलीला हटवून त्याच्या जागी रोहित शर्माची भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नुयुक्ती केली आहे. यापूर्वी रोहितला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल, यासंदर्भात चर्चा होईल. या पदासाठी टीम इंडियाकडे तीन खेळाडू शर्यतीत आहेत.

'हे' 3 खेळाडू होऊ शकतात नवे उपकर्णधार -1. केएल राहुल - रोहित शर्माची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर, आता केएल राहुल नवा उपकर्णधार होऊ शकतो. केएल राहुल हा देखील एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्वही केले आहे. याशिवाय, राहुल आधीच टी-20 संघाचा उपकर्णधार आहे. राहुल चांगला यष्टिरक्षकही आहे. तसेच यष्टीरक्षकाला खेळाची चांगली जाणही असते. या संघाचा नवा कर्णधार होण्यासाठी राहुल हा सर्वात मोठा दावेदार आहे.

2. ऋषभ पंत -राहुलप्रमाणेच टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही टीम इंडियाच्या नव्या उपकर्णधार पदासाठी एका दावेदार आहे. खरेतर पंतने भारतीय संघात आता आपले स्थानही भक्कम केले आहे. निवड समिती माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे पंतला आजमावू शकतात. पंत हाही धोनीसारखाच चालू यष्टीरक्षक आहे आणि त्याला विकेटच्या मागून खेळाची चांगली जाण आहे. याशिवाय आयपीएल 2021च्या पहिल्या सत्रात त्याने दिल्ली कॅपिटल्सचे उत्तम प्रकारे नेतृत्वही केले होते. अशा स्थितीत रोहितसोबत पंतची जोडीही हिट ठरू शकते.

3. श्रेयस अय्यर -उपकर्णधार श्रेयस अय्यर हादेखील संघाचा उपकर्णधार होण्याचा तिसरा सर्वात मोठा दावेदार आहे. अय्यरने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. दुखापतीनंतर अय्यरने कसोटीत शानदार पुनरागमन केले. या फॉरमॅटमधील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले. रोहितसह श्रेयस अय्यरकडेही भारताचे उपकर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

टॅग्स :रोहित शर्माश्रेयस अय्यरलोकेश राहुलरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ
Open in App