Join us

भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार सलामीला; राष्ट्रकुल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

बर्मिंगहॅम : येथे पुढीलवर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या सामन्यांद्वारे क्रिकेटचे पुनरागमन होत असून, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.  याआधी १९९८ ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 09:07 IST

Open in App

बर्मिंगहॅम : येथे पुढीलवर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या सामन्यांद्वारे क्रिकेटचे पुनरागमन होत असून, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.  याआधी १९९८ मध्ये क्वाललाम्पूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा अखेरचा सहभाग राहिला होता. बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले असून, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. 

राष्ट्रकुल स्पर्धेत २९ जुलैला भारत व ऑस्ट्रेलिया सलामीला एकमेकांविरुद्ध भिडतील. स्पर्धेचा अंतिम सामना ७ ऑगस्टला खेळविण्यात येईल. स्पर्धा आयोजकांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) माहिती दिली की, ‘महिला क्रिकेट स्पर्धा २९ जुलैपासून एजबस्टन येथे खेळविण्यात येईल. कांस्य पदक आणि सुवर्ण पदकाची लढत ७ ऑगस्टला खेळविण्यात येईल.’ भारत-ऑस्ट्रेलिया या सलामी लढतीनंतर पाकिस्तान-बार्बाडोस हा सामना रंगेल. 

भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना खेळविण्यात येईल. ३ ऑगस्टला ऑस्ट्रेलिया-पाक सामना होणार असून, यजमान इंग्लंड ३० जुलैला आपला पहिला सामना पात्रता फेरीतून मुख्य फेरीत येणाऱ्या संघाविरुद्ध खेळेल. पात्रता फेरी २०२२ च्या सुरुवातीपासून खेळविण्यात येईल.

टॅग्स :महिलाभारत
Open in App