Join us  

T20 World Cup 2026 भारत, श्रीलंका येथे होणार; ICC ने सांगितलं २० संघ कसे पात्र ठरणार 

२०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे असल्याचेही जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 4:38 PM

Open in App

T20 World Cup 2026 qualification: अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना यंदा होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद दिले गेले आहे. १ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि या स्पर्धेत Stop Clock हा नवा नियम लागू होणार असल्याची घोषणा आयसीसीने केली. त्याचवेळी २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारतश्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे असल्याचेही जाहीर करण्यात आले. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता नियमही ICC ने जाहीर केले. या नियमांतर्गत २० संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी कसे पात्र ठरतील हे,  ICC ने स्पष्ट केले आहे. 

ICC ने पुरुषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ पात्रता प्रक्रियेला देखील मान्यता दिली आहे. २० संघांचा समावेश असलेला हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाईल आणि एकूण १२ संघ रँकिंग व २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पात्र ठरतील. २०२४ च्या वर्ल्ड कपमधील अव्वल ८ संघ आपोआप २०२६साठी पात्र ठरतील. आयसीसी क्रमवारीच्या आधारे दोन ते चार संघ आपले स्थान निश्चित करतील. 

दुसरीकडे, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही यजमान देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरतील. जर भारत आणि श्रीलंका अव्वल ८ संघांमध्ये नसतील तर उर्वरित चार संघांमध्ये भारत आणि श्रीलंकेची नावे प्रथम समाविष्ट केली जातील. त्यानंतर आणखी दोन संघ क्रमवारीच्या आधारे आपले स्थान पक्के करू शकतील. भारत आणि श्रीलंकेने आधीच अव्वल ८ मध्ये आपले स्थान निर्माण केले तर इतर चार संघ क्रमवारीच्या आधारे पात्र ठरतील. २० पैकी उर्वरित आठ संघ प्रादेशिक पात्रता फेरीतून पात्र ठरतील.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतश्रीलंकाआयसीसी