India All Out For 201 In Reply To South Africa 489 1st Innings : मार्को यान्सेनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघातील फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे गुवाहाटी कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २८८ धावांची मोठी आघाडी घेत सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! आठव्या विकेटसाठी कुलदीप-वॉशिंग्टन जोडीनं केलेली भागीदारी ठरली सर्वोच्च
लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी बिन बाद ९ धावांवर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वालनं अर्धशतक ५८ (९७) ठोकलं. पण त्यानंतर भारतीय संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. तळाच्या फलंदाजी कुलदीप यादव १९(१३४) आणि वॉशिंग्ट सुंदर ४८ (९२) या दोघांनी आठव्या विकेटसाठी २०८ चेंडूत ७२ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच भारतीय संघाने कसाबसा २०० धावांचा आकडा पार केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकून मार्को यान्सेन याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
मार्को यान्सेन यानं रचला इतिहास, १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं
पहिल्या धावांत धमाकेदार बॅटिंगसह एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या मार्को यान्सेन याने गोलंदाजीत कमालीची कामगिरी करताना सर्वाधिक ६ विकेट्स घेत नवा इतिहास रचला आहे. १५ वर्षांत पहिल्यांदा भारतीय मैदानात डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सन याने २०१० च्या मोहाली कसोटी सामन्यात ६४ धावा खर्च करताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताकडून कुलदीप यादवनं केला सर्वाधिक चेंडूचा सामना
वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं सर्वोच्च भागीदारी करताना कुलदीप यादवनं १३४ चेंडूचा सामना करत १९ धावा केल्या. या सामन्यात कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडूचा सामना करण्याचा अनोखा रेकॉर्ड त्याच्या नावे जमा झाला. एवढेच नाही तर या सामन्यात भारताकडून सर्वाधिक चेंडूचा सामना करत त्याने आघाडीच्या फलंदाजांना या मैदानात कशा प्रकारे खेळण्याची गरज होती त्याचा धडाही दिला आहे.
Web Summary : India collapsed against South Africa, all out for 201 after South Africa's 489. Jansen took 6 wickets. Only Kuldeep-Washington's partnership offered resistance. South Africa leads by 288 runs.
Web Summary : दक्षिण अफ्रीका के 489 के जवाब में भारत 201 पर ऑल आउट हो गया। जेनसन ने 6 विकेट लिए। कुलदीप-वॉशिंगटन की साझेदारी ही टिकी रही। दक्षिण अफ्रीका की 288 रनों की बढ़त।