Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत-द. आफ्रिका सामने स्थगित होणार नाहीत’; BCCI-आफ्रिका बोर्डाची सामंजस्य भूमिका

एखादा खेळाडू कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास काय होईल, हा वादाचा मुद्दा होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:39 IST

Open in App

नवी दिल्ली : खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ यापैकी कुणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल. मात्र, भारत-द.आफ्रिका यांच्यातील आगामी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका स्थगित होणार नाही, अशी सामंजस्य भूमिका बीसीसीआय आणि क्रिकेट द. आफ्रिका यांनी घेतल्याची माहिती सीएसएचे वैद्यकीय अधिकारी सुहेब मंजरा यांनी दिली. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्यास बाध्य केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

तीन कसोटी सामन्यांची मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होईल.  द.आफ्रिकेत स्थिती अतिगंभीर असेल तर भारत माघार घेऊ शकतो, यावरही एकमत झाले. मंजरा म्हणाले, ‘आम्ही बीसीसीआयशी चर्चा केली.  प्रोटोकॉल आणि बायो-बबलविषयी मत जाणून घेतले. खेळाडू किंवा स्टाफ पाॅझिटिव्ह आल्यास त्यांना त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल. संपर्कात आलेले खेळाडू सामना खेळणे आणि सराव सुरूच ठेवतील. त्यांची दररोज रॅपिड अँटिजन चाचणी केली जाईल. येथील बायो-बबलवर बीसीसीआय समाधानी आहे.’

मालिका प्रेक्षकांविना

एखादा खेळाडू कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास काय होईल, हा वादाचा मुद्दा होता. दोन्ही बोर्डनी यावर तोडगा काढलेला आहे. यामुळे मालिका निर्धारित वेळापत्रकानुसार पार पडेल, असा विश्वास बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला. या मालिकेतील सामने मात्र प्रेक्षकाविना खेळविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :भारतद. आफ्रिका
Open in App