Join us
Daily Top 2Weekly Top 5

ACC Women’s Asia Cup : ४७ चेंडूत संपवली मॅच! भारताची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तानचं काय?

जाणून घ्या महिला आशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये कुणी कुणाला नमवलं अन् काय आहे फायनलचं समीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:26 IST

Open in App

ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026 : राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' महिला संघाने नेपाळच्या संघाचा धुव्वा उडवत महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स  स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात UAE विरुद्धच्या पराभवासह झाली. पण त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पराभवाचा दणका देत दमदार कमबॅक केले अन् नेपाळविरुद्धच्या विजयासह सेमी फायनलचं तिकीट मिळवले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघाने ४७ चेंडूत संपवली मॅच

मंगळवारी १७ फेब्रुवारीला टेर्डथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक येथे भारत विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नेपाळला १८ षटकांत अवघ्या ७८ धावांत गुंडाळले. या धावसंख्येचा  पाठलाग करताना भारतीय संघाने  ७.५ षटकांत ३ बाद ८२ धावा करत सामना जिंकला.

तनुजा कंवर ‘प्लेयर ऑफ द मॅच’

भारतीय संघाकडून गोलंदाजीत धमक दाखवणाऱ्या तनुजा कंवर हिला  ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. तिने ४ षटकांत केवळ १२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. ती महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जाएंट्सच्या संघाकडून खेळताना दिसते. WPL २०२५ हंगामात तिने ९ सामन्यांत ७.९२ च्या इकॉनॉमीने ८ विकेट्स घेतल्या होत्या. तनुजाशिवाय नेपाळविरुद्धच्या सामन्यात मिनू मनी हिने  ४ षटकांत फक्त ८ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. संघाचे नेतृत्व करणाऱ्या राधा जाधवनं ३ षटकांत १७ धावा देत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. 

भारताकडून  फलंदाजीत वृंदाचा जलवा

नेपाळकडून समझाना खडका हिने १६ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा करत सर्वाधिक धावा केल्या. नेपाळच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डावातील ५ व्या चेंडूवरच दीपा यादवच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला.  अनुष्का शर्मा १० धावांवर माघारी परतली. मग वृंदा–तेजल जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ५४ धावांची भागीदारी रचत सामना भारताच्या बाजूने झुकवला. तेजलने १३ चेंडूत १८ धावा केल्या, तर वृंदा दिनेश १८ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ३९ धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला....तर भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल

'अ' गटात भारतीय संघाने ३ पैकी २ सामन्यातील विजयासह सेमीफायनलचं तिकीट बूक केलं. या गटातून दुसऱ्या सेमीफायनलिस्टसाठी UAE आणि पाकिस्तान यांच्यात कांटे की टक्कर होती. पाकिस्तानच्या संघाने हा सामना जिंकला आहे. उत्तम धावगतीसह मॅच जिंकल्यामुळे पाकिस्तान महिला संघही सेमीफायलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत-पाक सामना रंगण्याचे संकेत मिळत आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : India enters ACC Women's Asia Cup semi-final; Pakistan's fate revealed.

Web Summary : India 'A' team stormed into the ACC Women’s Asia Cup semi-finals after crushing Nepal. Following an initial loss to UAE, India bounced back by defeating Pakistan. A dominant win against Nepal sealed their spot. Pakistan also qualified, raising prospects of an India-Pakistan final.
टॅग्स :एशिया कपभारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तान