Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियासह अनेक क्रीडापटूंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

आज 73व्या  स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 14:06 IST

Open in App

मुंबई: आज 73व्या  स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे. त्यासोबतच भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग , गौतम गंभीरसह  महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह अन्य क्रीडापटूंनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच सध्या  टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून बुधवारी झालेल्या तीसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन वन डे सामन्यांची मालिकासुद्धा  2- 0 अशा फरकाने जिंकून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनी विजयाची भेट दिली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनभारतसचिन तेंडुलकर