स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक थोडक्यात हुकले, पण टीम इंडियाने नोंदवला सलग तिसरा विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा स्मृती मानधनाचे ( SMRITI MANDHANA ) वादळ पुन्हा घोंगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:58 PM2024-06-23T20:58:53+5:302024-06-23T20:59:12+5:30

whatsapp join usJoin us
IND Women won by 6 wickets against SA Women; SMRITI MANDHANA 90 (83) with 11 fours - missed out on a golden opportunity to become the first Asian to score 3 consecutive centuries in women's ODIs | स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक थोडक्यात हुकले, पण टीम इंडियाने नोंदवला सलग तिसरा विजय

स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक थोडक्यात हुकले, पण टीम इंडियाने नोंदवला सलग तिसरा विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND Women vs SA Women : भारतीय महिला संघाने तिसऱ्या व शेवटच्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्स व ५६ चेंडू राखून दणदणीत विजय नोंदवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा स्मृती मानधनाचे ( SMRITI MANDHANA ) वादळ पुन्हा घोंगावले, परंतु तिला ऐतिहासिक शतकापासून थोडक्यासाठी मुकावे लागले. स्मृतीने ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. भारतीय महिला संघाने २१६ धावांचे लक्ष्य ४०.४ षटकांत सहज पार केले.


दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड्ट ( ६१) आणि तझमिन ब्रिट्स ( ३८) यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी मधल्या फळीला झटपट गुंडाळले. नॅदीने डी क्लेर्क ( २६) व मिएके डे रिडर ( २६) यांच्या योगदानामुळे आफ्रिकेने ८ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या अरुंद्धती रेड्डी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात स्मृती व शफाली वर्मा यांनी ६१ धावांची भागीदारी केली. शफाली २५ धावांवर माघारी परतली. त्यानंतर आलेली प्रिया पुनिया ( २५) हिनेही स्मृतीसह ६२ धावा जोडल्या. 


स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही ४८ धावा जोडल्या. मागील दोन सामन्यांत शतक झळकावणारी स्मृती ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावांवर बाद झाली. आज तिने शतक झळकावले असते तर ती वन डे क्रिकेटमध्ये सलग तीन शतकं झळकावणारी पहिली आशियाई खेळाडू बनली असती. पण, तिने एकाच मालिकेत सर्वाधिक ( किमान ३ इनिंग्ज) धावा करण्याचा विक्रम स्मृतीने नावावर केला.  तिने या मालिकेत ३४३ धावा केल्या आहेत आणि टॅमि बियूमोंट ( ३४२ वि. पाकिस्तान, २०१६) हिचा विक्रम मोडला.

हरमनप्रीतने ४२ धावांची आणि जेमिमा रॉड्रीग्जने १९ धावांची खेळी करून आज भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. 


 

Web Title: IND Women won by 6 wickets against SA Women; SMRITI MANDHANA 90 (83) with 11 fours - missed out on a golden opportunity to become the first Asian to score 3 consecutive centuries in women's ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.