Join us

ENG vs IND : हवेत राहिली अन् फसली! सिराजची विकेट चर्चेत असताना त्यात या पोरीनं घातली भर Video

आता तिची विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:34 IST

Open in App

भारत आणि इंग्‍लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानातील तिसरा कसोटी सामना चांगलाच रंगतदार झाला. या सामन्यात मोहम्मद सिराजच्या रुपात टीम इंडियाने जी शेवटची विकेट गमावली त्याची चर्चा थेट ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत पोहचलीये. ब्रिटनचे किंग चार्ल्स (III) यांनी टीम इंडियाची भेट घेतल्यावर गिलसोबत गप्पा गोष्टी करताना सिराजची विकेट दुर्देवीरित्या पडली, असे म्हटले होते. त्यात आता आणखी एका विकेटची भर पडलीये.  भारत-इंग्लंड महिला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात हरलीन देओल हिने रन आउटच्या रुपात विकेट गमाल्याचे पाहायला मिळाले. आता तिची विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ती हवेत राहिली अन् फसली!

भारत-इंग्लंड महिला संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना साउथहॅम्पटनच्या द रोज बाउल मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात हरलीन देओल दुर्देवीरित्या रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले. धाव घेण्यासाठी तिने योग्य कॉल केला एवढेच नाही तर स्टंपवर डायरेक्ट थ्रो होण्यापूर्वी ती क्रिजमध्येही पोहचली होती. तरी तिला रन आउट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. कारण चेंडू स्टंपवर लागला त्यावेळी हरलीन देओलची बॅट अन् पाय दोन्ही हवेत होते. 

ENG W vs IND W 1st ODI : दीप्तीची विक्रमी खेळी! टीम इंडियाची वनडे मालिकेत विजयी सलामी

 डेविडसन रिचर्ड्सचा डायरेक्ट थ्रो अन्...

इंग्लंडच्या संघाने दिलेल्या २५९ धावसंख्येचा पाठलाग करताना हरलीन देओल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. २२ व्या षटकात चार्ली डीनच्या गोलंदाजीवर हरलीन हिने  मिड-ऑनच्या दिशेला चेंडू टोलावला. चेंडू मारल्यावर एका धावेसाठी तिने क्रिज सोडले. नॉन स्ट्राइक एन्डला ती सुरक्षित पोहचलीये, असे वाटत होते. पण रिप्लेमध्ये तिची बॅट अन् पाय दोन्ही हवेत असल्याचे दिसून आले. क्रिकेटमध्ये धाव घेताना जी बेसिक गोष्ट पाळायची असते तेच ती विसरली अन् याची किंमत तिला आपल्या विकेटच्या रुपात मोजावी लागली. धाव पूर्ण करत असताना बॅटर्संने बॅट जमिनीवर घासत क्रिजमध्ये पोहचावे, हा एक बेसिक नियम आहे. हरलीन हिने ४४ चेंडूचा सामना करताना २७ धावांची खेळी केली. या खेळीत तिने ४ चौकार मारले.  

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघव्हायरल व्हिडिओ