Who Is 20 Year Old Vaishnavi Sharma Makes International Debut Against Sri Lanka : भारतीय महिला संघाने विशाखापट्टणम येथील ACA–VDCA स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातून आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची सुरुवात केली आहे. हा सामना २० वर्षीय वैष्णवी शर्मासाठी खास आणि अविस्मरणीय ठरला. कारण WPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलरला आंतरारष्टीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने डेब्यू कॅप दिली. भारतीय टी-२० संघात खेळणारी ती ८९ वी खेळाडू ठरली. इथं जाणून घेऊयात कोण आहे वैष्णवी शर्मा? कसा आहे तिचा इथपर्यंतचा प्रवास यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैष्णवी शर्मा कोण आहे?
वैष्णवी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी आहे. तिचे वडील नरेंद्र शर्मा हे व्यवसायाने ज्योतिष आहेत. वैष्णवी शर्मा ही यंदाच्या अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील प्रमुख सदस्य होती. या स्पर्धेत तिने सर्वाधिक १७ विकेट्स घेत लक्षवेधले होते. या कामगिरीनंतर तिने देशांतर्गत क्रिकेटमधील सीनियर महिला टी-२० ट्रॉफी स्पर्धेत २१ विकेट्स घेतल्या. या दोन स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिला भारतीय संघात संधी मिळाली आहे. WPL च्या मेगा लिलावात तिला कुणीही भाव दिला नव्हता.
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
महिला U19 स्पर्धेत हॅटट्रिकची कमाल
वैष्णवीने १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२५ स्पर्धेत हॅटट्रिकचा डाव साधला होता. मलेशियाविरुद्धच्या या कामगिरीसह ती हॅटट्रिकचा डाव साधणारी भारताची सर्वात युवा गोलंदाजही ठरली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करताना वैष्णवीला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाली आहे. या संधीच सोनं करून दाखवत ती आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट पक्के करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेटची संधी होती, पण...
वैष्णवीनं पदार्पणातील टी-२० सामन्यातील पहिल्या षटकात विकेटची संधी निर्माण केली होती. पण श्री चरणीनं कॅच सोडला अन् शेवटी चार षटकांच्या कोटा पूर्ण केल्यावरही वैष्णवीला विकेट लेस रहावे लागले. ४ षटकात तिने फक्त १६ धावा खर्च केल्या. ही जमेची बाजू ठरली.