IND W vs SL W India Women Beat Sri Lanka Women 3rd T2OI : शफाली वर्माच्या बॅटमधून आलेल्या सलग दुसऱ्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजयी हॅटट्रिकसह श्रीलंकेविरुद्धची मालिका खिशात घातली आहे. तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रेणुका सिंह ठाकूर आणि दीप्ती शर्मानं कर्णधार हरमनप्रीत कौरचा निर्णय सार्थ ठरवला. या दोघींच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी श्रीलंकन महिला संघ निर्धारित २० षटकात ७ बाद ११२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. श्रीलंकेनं ठेवलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना शफाली वर्माने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली. तिच्या आक्रमक खेळीमुळे तिसरा सामानही एकतर्फी झाला. तिनेच खणखणीत चौकार मारत भारतीय संघाला ८ विकेट्स आणि ४० चेंडू राखून विजय निश्चित केला.
श्रीलंकेविरुद्ध सलग चौथ्यांदा जिंकली टी-२० मालिका, तिसऱ्या सामन्यातील विजयासह हमनप्रीत कौरच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड
तिरुवनंतपुरमच्या मैदानातील सामन्यातील विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांती मालिका खिशात घातली. श्रीलंकेविरुद्ध सलग चौथ्यांदा भारतीय संघाने टी -२० मालिका जिंकली आहे. याशिवाय हा विजय भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीही खास ठरला. कारण भारतीय संघाच्या तिरुवनंतपुरमच्या मैदानातील विजयासह हरमनप्रीत कौर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरली. तिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ७७ वा टी-२० सामना जिंकला आहे. मेग लेनिंगला मागे टाकत हरमप्रीत कौरच्या टी-२० मधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे.
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
स्मृती मानधना पुन्हा स्वस्तात माघारी फिरली, शफाली वर्मानं पुन्हा मैफील लुटली
५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ११३ धावांचा बचाव करताना श्रीलंकेच्या संघाने स्मृती मानधनाच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. सलग तिसऱ्या सामन्यात स्मृती अपयशी ठरली. ६ चेंडूचा सामना करून एका धावेवर ती बाद झाली. तिची जागाघेण्यासाठी आलेल्या जेमिमालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. जेमिमा रॉड्रिग्जनं १५ चेंडूत ९ धावा केल्या. एका बाजूला विकेड पडल्या तरी शफाली वर्माचा आक्रमक अंदाज बदलला नाही. शवटपर्यंत तिने या तोऱ्यात खेळत कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीनं टीम इंडियाचा विजय पक्का केला. शफाली वर्मानं ४२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौर १८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २१ धावांवर नाबाद राहिली.
गोलंदाजीत रेणुकासह दीप्तीची हवा
पहिल्या दोन सामन्यात संघाबाहेर राहिलेल्या रेणुका सिंह ठाकूरला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली. पहिल्या षटकात ती महागडी ठरली. पण त्यानंतर दुसऱ्या षटकात २ आणि उर्वरित २ षटकांत २ विकेट्स घेत तिने भारतीय संघाकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय दीप्ती शर्मानं ३ विकेट्सचा डाव साधला.