लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचाही साधला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:30 IST2025-12-26T20:25:57+5:302025-12-26T20:30:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND W vs SL W Deepti Sharma Creates History Becomes 1st Indian Get 150 Wickets In T20I And Equaled Megan Schutt Most T20 Wickets Record | लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज

लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज

Deepti Sharma Creates History Becomes 1st Indian  To ... आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या दीप्ती शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १५० विकेट्सचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली. एवढ्यावरच न थांबता तिने ऑस्ट्रेलियन मेगन शुट (Megan Schutt) च्या वर्ल्ड रेकॉर्डचीही बरोबरी साधील आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक  विकेट्स घेणाऱ्या महिला गोलंदाजांच्या यादीत ती मेगन शुटसह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे. दोघींनी आतापर्यंत प्रत्येकी १५१-१५१ विकेट्स घेतल्या आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची यादी 

खेळाडूकारकीर्द (वर्षे)सामनेविकेट्ससर्वोत्तम गोलंदाजीसरासरीइकॉनॉमीस्ट्राईक रेट
मेगन शट (ऑस्ट्रेलिया)२०१३–२०२५१२२१५१५/१५१७.७०६.४०१६.५७
दीप्ती शर्मा (भारत)२०१६–२०२५१२८१५१४/१०१८.८४६.१०१८.५९
हेन्रियेट इशिम्वे (रवांडा)२०१९–२०२५११११४४५/६१०.३३४.३११४.३६
निदा दार (पाकिस्तान)२०१०–२०२४१५२१४४५/२१२०.२०५.७०२१.२६
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)२०१६–२०२५१००१४२४/१८१५.७३५.९६१५.८१

 

Web Title : लेडी डीएसपी दीप्ति शर्मा ने रचा इतिहास: पहली भारतीय गेंदबाज!

Web Summary : दीप्ति शर्मा ने श्रीलंका के खिलाफ इतिहास रचा, 150 टी20आई विकेट लेने वाली पहली भारतीय गेंदबाज बनीं। उन्होंने मेगन शुट्ट के विश्व रिकॉर्ड की बराबरी की, अब संयुक्त रूप से सबसे अधिक टी20आई विकेट (151) के लिए शीर्ष स्थान पर हैं।

Web Title : Lady DSP Deepti Sharma Creates History: First Indian Bowler!

Web Summary : Deepti Sharma made history against Sri Lanka, becoming the first Indian bowler to take 150 T20I wickets. She equaled Megan Schutt's world record, now jointly holding the top spot for most T20I wickets (151).

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.