श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संघ अडचणीत सापडला असताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटमधून जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. टी-२० कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावत तिने संघाचा डाव सावरला. फिक्या ठरल्या त्यावेळी तिने ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५८.१४ च्या सरासरीसह ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकात अरुंधतीचा धमाका
अखेरच्या षटकात अरुंधती रेड्डीनं आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवताना ११ चेंडूत २२४.४५ च्या सरासरीसह नाबाद २७ धावांची खेळी करत निर्धारित २० षटकात भारताच्या धावफलकावर १७५ धावा लावल्या. या दोघींशीवाय अमनजोत कौर २१ (१८), जी कमलिनी १२(१२) आणि हरलीन देओल १३(११) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण त्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या.
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
ना स्मृतीच्या जागी आलेली नवी रनरागिणी चालली ना शेफालीचा जलवा दिसला
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या चार सामन्यात दमदार विजय नोंदवला आहे. पाचव्या आणि अखेरचा टी-२० सामन्यात टीम इंडिया पाहुण्या लंकेला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूनं लागल्यावर चमिरा अट्टापटूनं पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने स्मृती मानधनाला विश्रांती देत तिच्या जागी युवा बॅटर जी. कमलिनी हिला पदार्पणाची संधी दिली. शेफाली वर्माच्या साथीनं तिने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पण दोघीही स्वस्तात माघारी फिरल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या हरलीन देओल हिलाही आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवता आली नाही. दीप्ती शर्मा आणि रिचा घोषही एकेही धावसंख्येवरच माघारी फिरल्या. भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरसह तळाच्या फलंदाजीत अरुंधती रेड्डीनं केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावली.