Smriti Mandhana And Pratika Rawal Record Highest Ever Opening Partnership For India in Women’s ODI World Cup : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २४ वा सामना नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात हरमनप्रीत कौरनं नाणेफेक गमावल्यावर टीम इंडियावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. सेमीफायनलच तिकीट पक्के करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत भारताची उप कर्णधार स्मडती मानधना हिने हिने प्रतीका रावलच्या साथीनं भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही सलामीच्या बॅटरच्या भात्यातून आली सेंच्युरी; महिला वर्ल्ड कप स्पर्धेत ३७ वर्षांनी असं घडलं
स्मृती मानधना हिने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची दमदार खेळी केली. सुझी बेट्सचनं तिच्या खेळीला ब्रेक लावला. प्रतीका रावल हिने १३४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १२२ धावांची धमाकेदार खेळी केली. १९७३ च्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा इंग्लंडच्या लिन थॉमस आणि एनिड बेकवेल या दोघींनी संघाच्या डावाची सुरुवात करताना दोघींनी शतकी खेळी केली होती. त्यानंतर १९८८ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर आणि रूथ बकस्टीन या सलामीच्या बॅटर्संनी शतकी खेळी साकारली होती. आता ३७ वर्षांनी स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे.
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
पहिल्या विकेटसाठी रचली विक्रमी भागीदारी
न्यूझीलंड विरुद्धच्या 'करो वा मरो' च्या लढतीत स्मृती मानधना आणि प्रतीका रावल दोघींनी मिळून नवा इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३३.२ षटकात २१२ धावांची भागीदारी रचली. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामी जोडीनं केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा थिरुश कामिनी आणि पुनम राऊत यांच्या नावे होता. या दोघींनी २०१३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध १७५ धावांची भागीदारी रचली होती.
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च धावंसख्येचा रेकॉर्ड
- स्मृती मानधना आणि प्रतीका रावल-२१२ धावा विरुद्ध न्यूझीलंड (२०२५)
- थिरुश कामिनी आणि पुनम राऊत- १७५ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (२०१३)
- स्मृती मानधना आणि प्रतीका रावल - १५५ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२५)
- स्मृती मानधना आणि पुनम राऊत - १४४ धावा विरुद्ध इंग्लंड (२०१७)
- अंजू जैन आणि जया शर्मा - १०७ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (२००५)