How India Can Enter Women's World Cup Semi Final After Loss Against England : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इंदूरच्या मैदानात भारतीय महिला संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा संघ हा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता एका जागेसाठी तीन संघ शर्यतीत असून भारतीय संघाला अजूनही शेवटच्या आणि चौथ्या संघाच्या रुपात सेमीत धडक मारण्याची संधी आहे. इथं जाणून घेऊयात टीम इंडियासाठी कसं आहे सेमीच समीकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेमीफायनलमधील ३ संघ ठरले; आता एका जागेसाठी दोघांमध्ये खरी स्पर्धा
आतापर्यंत ४ पैकी ३ संघ सेमीसाठी पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायलमध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरला होता. त्यानंतर आता इंग्लंडने आपली जागा पक्की केली आहे. उर्वरित एका जागेसाठी तांत्रिकृष्ट्या ५ संघ अजूनही शर्यतीत दिसत असले तरी यातील फक्त दोन संघ खऱ्या अर्थाने शर्यतीत आहेत.
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली स...
नवी मुंबईच्या मैदानातील लढतीत स्पष्ट होईल चित्र
इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ ५ पैकीस २ विजयासह ४ गुण कमावत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाशिवाय न्यूझीलंडच्या न्यूझीलंडच्या खात्यातही ४ गुण जमा आहेत. पण नेट रनरेटमुळे न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. २३ ऑक्टोबरला भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या या सामन्यात चौथा संघ कोण ते जवळपास निश्चित होईल. जो संघ हा सामना जिंकेल, त्याचे सेमीचं तिकीट जवळपास पक्के होईल. जो संघ पराभूत होईल त्याला अखेरचा सामना जिंकून या शर्यतीत टिकून राहिल, पण त्या संघाचं सेमीचं गणित हे इतर संघाच्या निकालावर अवलंबून असेल.
टीम इंडियासाठी असे आहे सेमीच समीकरण
भारतीय संघाला सर्वात आधी २३ ऑक्टोबरला होणारा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्यानंतर २६ ऑक्टोबरला भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळेल. या सामन्यातील सलग दुसऱ्या विजयासह टीम इंडियाच्या खात्यातवर ८ गुण जमा होतील आणि टीम इंडिया स्वबळावर सेमीसाठी पात्र ठरेल.
न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला तर काय?
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला तर मात्र या शर्यतीत न्यूझीलंड आघाडीवर असेल. या परिस्थितीत भारतीय संघाला बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाला इंग्लंडनं पराभूत करावे, अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल, एवढेच नाही तर बांगलादेश किंवा पाकिस्तानचा संघ अनपेक्षितरित्या ६ गुणांपर्यंत पोहचला तर त्यांच्यापेक्षा उत्तम नेट रनरेट असेल तरच टीम इंडियाची डाळ शिजेल. या समीकरणात न अडकता भारतीय संघ उर्वरित दोन सामने जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील राहिल.