Join us

Harmanpreet Kaur World Cup Record : मितालीनंतर असा पराक्रम करणारी दुसरी बॅटर ठरली हरमनप्रीत

कुणाच्या नावे आहे महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 22:19 IST

Open in App

IND W VS ENG W, Harmanpreet Kaur World Cup Record : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंदूरच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अखेर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट तळपली. इंग्लंडच्या संघाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरनं स्मृती मानधनाच्या साथीनं शतकी भागिदारी रचत संघाचा डाव सावरला. या सामन्यात तिच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील पहिले अर्धतक आले. या खेळीसह तिने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असा पराक्रम करणारी दुसरी भारतीय बॅटर ठरली हरमनप्रीत

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात  हरमनप्रीत कौरनं १० चौकाराच्या मदतीने ७० चेंडूत ७० धावांची आश्वासक खेळी केली. यासह महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत १००० धावांचा पल्ला गाठणारी ती दुसरी भारतीय बॅटर ठरली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ५३ धावा करताच तिने हा पल्ला पार केला. मिताली राज ही भारताकडून अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय बॅटर आहे. एवढेच नाही तर महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्समध्ये ती दुसऱ्या स्थानावर आहे.

कुणाच्या नावे आहे महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड 

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या डेबी हॉकलीच्या नावे आहे. तिने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत १५०१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. त्यापाठोपाठ या यादीत मिताली राजचा नंबर लागतो. मितालीनं आपल्या कारकिर्दीत वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत १३२१ धावा केल्याचा विक्रम आहे.

हरमनप्रीतसह वर्ल्डकप स्पर्धेत १००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या अन्य ५ बॅटर्स

  • जॅन ब्रिटीन (इंग्लंड) (१९८२-९७) ३६ सामन्यातील ३५ डावात १२९९ धावा
  • शार्लट एडवर्ड्स (इंग्लंड) (१९९७-२००१३) ३० सामन्यातील २८ डावात १२३१ धावा
  • सुझी बेट्स (न्यूझीलंड) (२००९-२५) ३० सामन्यातील २८ डावात १२०८ धावा
  • बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) (१९९३-२००५) २९ सामन्यातील २६ डावात ११५१ धावा
  • हरमनप्रीत कौर (भारत) (२००९-२०२५) ३१ सामन्यातील २७ डावात  १०१७ धावा
English
हिंदी सारांश
Web Title : Harmanpreet Kaur achieves World Cup milestone, second after Mithali Raj.

Web Summary : Harmanpreet Kaur shone in the England match, scoring a crucial half-century and surpassing 1000 World Cup runs. She is the second Indian to achieve this after Mithali Raj, joining a select group of elite batters.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५हरनमप्रीत कौरभारतीय महिला क्रिकेट संघमिताली राज