IND vs ZIM Surya Kumar Yadav 4000 International Runs : चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने छोट्याखानी खेळीसह मोठा डावा साधला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यानं झिम्बाब्वे गोलंदाजांच्या विरोधात कडक फटेकाबीजी करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने फक्त १३ चेंडूत ३३ धावा करत संघासाठी बहुमूल्य योगदान दिले. नगारवाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. पण त्याआधी त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. चेन्नईच्या मैदानात सूर्यकुमार यादवनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १४८ सामने खेळले आहेत. यात १ कसोटी, ३७ वनडे आणि ११० टी-२० सामन्यांचा समावेश आहे. १४० डावांत फलंदाजी करताना त्याने ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. या काळात सूर्या यांच्या बॅटमधून वनडेतील ५ अर्धशकासह टी २० मध्ये ४ शतके आणि २५ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजीमुळे तो भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे.
Web Summary : Surya Kumar Yadav's explosive innings of 33 runs off 13 balls in Chennai propelled him past 4000 international runs. His contribution included three fours and two sixes, showcasing his aggressive batting style against Zimbabwe.
Web Summary : चेन्नई में सूर्यकुमार यादव ने 13 गेंदों में 33 रनों की तूफानी पारी खेलकर 4000 अंतरराष्ट्रीय रन पूरे किए। उनकी पारी में तीन चौके और दो छक्के शामिल थे, जिससे जिम्बाब्वे के खिलाफ उनकी आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन हुआ।