IND vs ZIM ODI : भारताच्या अष्टपैलू खेळाडूची नशिबाने थट्टा मांडली; दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली

IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:45 AM2022-08-16T11:45:17+5:302022-08-16T11:46:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM ODI : Washington Sundar RULED OUT of Zimbabwe series, set to spend another spell on sidelines | IND vs ZIM ODI : भारताच्या अष्टपैलू खेळाडूची नशिबाने थट्टा मांडली; दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली

IND vs ZIM ODI : भारताच्या अष्टपैलू खेळाडूची नशिबाने थट्टा मांडली; दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लोकेश राहुल तंदुरुस्त होईल की नाही, याची भिती होती, परंतु त्याने फिटनेस टेस्ट पास केली अन् शिखर धवनला हटवून कर्णधार म्हणून हरारे येथे दाखल झाला. पण, भारताला धक्का बसायचा तो बसलाच. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar Injury) याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. इंग्लंडमध्ये Royal London Cup स्पर्धेत खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला आणखी एक मालिकेला मुकावे लागले. आयपीएल २०२२मध्ये बोटाला झालेल्या दुखापतीतून तो नुकताच सावरला होता.

भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी इंग्लंडमध्ये कौंटी अजिंक्यपद व Royal London Cup  स्पर्धा खेळण्यासाठी पाठवले होते. पण, नशीबाने त्याची थट्टा मांडली अन् १२ महिन्यांत चौथ्यांदा त्याला दुखापत जाली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मुकावे लागले होते. ''वॉशिंग्टन सुंदरनेझिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या डाव्या खांद्याला Royal London Cup स्पर्धेतील सामन्यादरम्यान दुखापत झाली. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमती जाणार आहे,''असे BCCI च्या सूत्रांनी PTI ला सांगितले.  

- हाताला झालेल्या दुखापतीमुळे २०२१मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार
- आयपीएल २०२१चं निम्मे सत्र हाताच्याच दुखापतीमुळे खेळू शकला नाही
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही याच दुखापतीमुळे त्याचा विचार केला गेला नाही
- डिसेंबर २०२१मध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला
- मांडीचे स्नायू ताणल्यामुळे घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून माघार
-  याच दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकला
- आयपीएल २०२२चे पाच सामने हाताच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही
- खांद्याच्या दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार

भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर  

 

Web Title: IND vs ZIM ODI : Washington Sundar RULED OUT of Zimbabwe series, set to spend another spell on sidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.