ICC T20 World Cup 2026 : Hardik Pandya Winning Player Of The Match Award :आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीतील झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने सेमीची दावेदारी भक्कम केली आहे. यंदाच्या हंगामात साखळी फेरीतील जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने सुपर ८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच सामना ७६ धावांनी गमावला अन् गत चॅम्पियन संघ सेमीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. चेन्नईच्या मैदानातील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीआधी ड्रेसिंग रुममधील सर्वांचे लक्ष हे नरेद्र मोदी स्टेडियमवरील सामन्याकडेही होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरल्यावर हार्दिक पांड्याने ड्रेसिंग रुममधील खास गोष्टही शेअर केली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर हार्दिक पांड्यानं शेअर केली ड्रेसिंगरुमधील 'ती' गोष्ट
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने २३ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. या खेळीमुळे तो सामनावीरही ठरला. हा पुरस्कार स्वीकारताना हार्दिक पांड्याने ड्रेसिंग रुममधील खास गोष्ट शेअर केली. तो म्हणाला की, "मी माझ्या खेळीवर समाधानी आहे. सुरुवातीला मी ताकदीने फटके मारण्याचा प्रयत्न करत होतो. पण नंतर जाणवलं की, चेंडूला टाइमिंग दिलं तरी सहज षटकार मारता येतात. माझी लय टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. तसेच आम्ही सर्व दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्याकडेही लक्ष्य ठेवून होतो."
India Semi Final Scenario : टीम इंडियावरील मोठं संकट टळलं! आता वाटेतील 'हा' अडथळा करावा लागेल दूर
ज्यांनी टेन्शन वाढवलं त्यांच्या सामन्यावर खिळल्या होत्या टीम इंडियाच्या नजरा
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया सेमीच्या शर्यतीत टिकणं म्हणजे मुश्किल समीकरण होते. टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सामना महत्त्वपूर्ण झाला होता. शेवटी ज्या संघाने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होते त्या दक्षिण आफ्रिकेनेच सूर्या ब्रिगेडसाठी सेमीची लढाई स्वबळाची करण्यासाठी हातभार लावला. दक्षिण आफ्रिकेनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजला पराभवाचा दणका दिला. हा निकाल चेन्नईच्या मैदानात झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियासाठी दिलासा देणारा ठरला. झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर हार्दिक पांड्यानेही 'त्या' सामन्याचे महत्त्व अधोरेखित केले.
टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार
- विराट कोहली- ८
- सूर्यकुमार यादव- ४
- हार्दिक पांड्या- ३
- युवराज सिंग- ३
- रविचंद्रन अश्विन -३
- रोहित शर्मा- ३